रोटरी क्लब ऑफ सांगोला यांच्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रम

रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने श्री अंबिका देवी मंदिर गोंधळी गल्ली जय भवानी चौक सांगोला येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले. सर्व भाविक भक्तासाठी मोफत रक्त तपासणी घेण्यात आले.यात अंदाजे १०० भाविकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी रो.धनाजी शिर्के यांनी बहुमोल सहकार्य केले
यानंतर रो. सुरेश आप्पा माळी यांच्या सहकार्याने आरतीच्या वेळी फळे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.या वेळेस साधारण ३०० भाविकानी याचा लाभ घेतला.तसेच Save Girl Safe Girl अंतर्गत जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी रो.विकास देशपांडे,रो.विलास बिले,रो.महादेव कोळेकर,रो.प्रा.महादेव बोराळकर,रो.संतोष गुळमिरे, रो.मिलिंद बनकर,रो. अशोक गोडसे,रो.मधुकर कांबळे रो.नागेश तेली,रो.डॉ. अनिल कांबळे आदी रोटरी सदस्य हजर होते.
तसेच मंदिराचे पुजारी श्री.शिर्के यांचे सहकार्य मिळाले.