महाराष्ट्रसांगोला तालुका

सांगोला नगरपरिषदेने थकबाकीदारांचे गाळे व मालमत्ता केले सिल

 

सांगोला नगरपरिषदेमार्फत मागील दोन महिन्यांपासून कर वसुलीसाठी विशेष वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. या विशेष वसुली मोहिमेअंतर्गत थकबाकीदारांना भाडे व कराच्या रक्कमा भरणेबाबत नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचेमार्फत वारंवार सूचना देण्यात येत आहेत. परंतु तरीदेखील थकीत भाडे व कराच्या रक्कमा भरणा न झालेने मा. मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांचे मार्गदर्शनाखाली नगरपरिषद मालकीचे एकूण ७ गाळे थकीत भाडे व कराच्या रकमेपोटी सिल करण्यात आले.

स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने विशेष वसुली मोहीम राबविण्याबाबत नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडून वारंवार आढावा व सूचना देण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून नगरपरिषद मालकीचे खालील गाळे सील करण्यात आले.

 

 

सदरची कारवाई मा. मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांचे मार्गदर्शनाखाली कार्या. अधीक्षक श्री. स्वप्निल हाके, लेखापाल श्री.धनाजी साळुंखे, सतीश बनसोडे, अश्वजित माने, अनिकेत चंदनशिवे, संजय गावडे, आनंद हुलजंतीकर, शरद चव्हाण, संतोष ठोकळे, योगेश रसाळ, संतोष जांगळे व रमेश मोरे यांच्या उपस्थितित करण्यात आली.

थकबाकी रकमांच्या वसुलीसाठी नगरपरिषदेकडून वारंवार सूचना देऊनही थकबाकीच्या रकमा न भरणाऱ्यांकडील मालमत्ता सिल करण्यात येणार आहेत. तरी सर्व मालमत्ताधारकानी लवकरात लवकर कर भरणा करून नगरपरिषदेस सहकार्य करावे व कटू कारवाई टाळावी.

सुधीर गवळी, मुख्याधिकारी, नगरपरिषद सांगोला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!