*सांगोला विद्यामंदिरमध्ये माजी विद्यार्थी निलेश इंगळे याची उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न

सांगोला ( प्रतिनिधी ) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचा माजी विद्यार्थी कुमार निलेश दत्तात्रय इंगळे याची एमपीएससी परीक्षेमधून उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके व प्राचार्य गंगाधर घोंगडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शहिदा सय्यद, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपट केदार, बिभीषण माने तसेच सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना निलेश इंगळे यांनी या यशा पाठीमागे सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केले जाणारे प्रयत्न कारणीभूत असल्याचे सांगितले.व प्रशालेचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उन्मेश आटपाडीकर सर यांनी केले.
तसेच या यशाबद्दल संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके सर्व संस्था सदस्य, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी निलेश इंगळे याचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या .