सांगोला तालुकामहाराष्ट्रराजकीय

महायुतीचे ठरलं; महाविकास आघाडीमध्ये खलबतं सुरूच.!

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नाराज पदाधिकाऱ्यांना "अच्छे दिन." 

 यंदांचे पूर्ण वर्ष निवडणुकीत जाणार आहे देशभरामध्ये अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वत्र राजकीय वातावरण तापू लागले आहे विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असून बैठका मिळावे आयोजित करून वातावरण निर्मिती केली जात आहे मतदारांशी विविध माध्यमातून संपर्क केला जात आहे निवडणुकीचा काळ असल्याने पक्षातील नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सध्या “अच्छे दिन” आले आहेत जिल्हास्तरावर काम करणारे नेते सक्रिय झाले असून मतदारसंघात गावोगावी फिरताना दिसत आहेत.       लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीकडून उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली शेवटी महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यास विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना यश आले आहे.
महायुतीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील मोठे प्रयत्न केले होते मात्र त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही तर उमेदवारी जरी मिळाली नसली तरी माढा लोकसभा मतदारसंघात गावोगावी गाठी-भेटी घेऊन जनतेच्या मनात काय आहे ? हे जाणून घेण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील मतदार संघातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत आहेत ते जातील त्या ठिकाणी बहुतांशी कार्यकर्त्यांकडून तुतारी हाती घेण्याची विनंती त्यांना केली जात असल्याचे दिसत आहे मात्र मोहिते पाटील यांनी अद्याप तरी वेट..अँड.. वॉच… ची भूमिका घेतली आहे.
    महायुतीचे उमेदवार जाहीर होताच महायुतीचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार कोण हे प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे ? तर भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही असणारे मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घ्यावी अशी आग्रही मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे.
  रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या देखील नावाची चर्चा मतदार संघात सर्वत्र सुरू आहे महा आघाडीकडून त्यांची उमेदवारी प्रबळ ठरेल अशा देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत मात्र ते माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवितात की नाही हे येणारा काळच सांगू शकेल.
  सांगोला येथील शेतकरी कामगार पक्षाचे नेते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये निसटता पराभव झालेले डॉ.अनिकेत देशमुख यांना ऐन वेळी महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे मात्र अद्याप महाविकास आघाडी कडून उमेदवार जाहीर झालेला नाही माढा लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात राजकीय रणधुमाळी सुरू असून संपूर्ण राज्याचे लक्ष माढा लोकसभा मतदारसंघाकडे लागून राहिले आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!