माढा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसची मान खटाव बैठक संपन्न

खटाव:- माढा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसची महत्वपूर्ण पदाधिकारी यांची बैठक काल शनिवार दिनांक २३ मार्च रोजी मान खटाव येथे पार पडली..महाविकास आघाडीचा उमेदवार येणाऱ्या काळात कोणताही असो तो निवडून देण्याचा संकल्प केला.. इंडिया आघाडी ला बळकटी देण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे हा निर्धार ही केला …
मोदी विरोधातील संपूर्ण देशामधील वातावरण इंडिया आघाडी ची लाट बनत आहे.त्यामुळे माढा आणि निंबाळकर पाढा या जनमानसांतील भावना ऊफाळून येताना चहुंकडे दिसत आहेत.राहुल गांधी हे सत्तेकर्ता नाही तर सत्यासाठी लढत आहेत हे संपूर्ण देशातील जनतेला कळालं आहे.त्यामुळे देशामध्ये काँग्रेसमय वातावरण आहे.. व इंडिया आघाडी देशामध्ये येणार आहे हे जनभावनेमधून निश्चित झालेलं आहे व माढ्या मधून महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार हाही आढावा कार्यकर्त्यांच्या गावदौऱ्यातुन व बेठकीमधून निष्पण झाला..
या बैठकीस माजी आमदार मा. श्री. रामहरी आप्पा रुपनर, मान सूतगिरणीचे चेअरमन व संयोजक मा.श्री.रणजितसिंह देशमुख, कुरूमदास साखर कारखाण्याचे चेअरमन मा. श्री.दादासाहेब साठे, एआय सीसी सदस्य शेलार सर फलटणचे तालुकाध्यक्ष मा. श्री महेंद्रसिंह सूर्यवंशी सांगोला तालुक्याध्यक्ष मा. श्री.अभिषेक कांबळे इतर सर्व तालुकाध्यक्ष पदाधिकारी व तसेच युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष मा. श्री. सागर सावंत सातारा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मा. श्री.पंकज पोळ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले व इतर सर्व तालुक्याध्यक्ष मा. श्री. तुषार माने सह आदी पदाधिकारी उपस्थित होते…