नाझरा विद्यामंदिर मध्ये कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांना अभिवादन

नाझरा( वार्ताहर):- सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, स्वातंत्र्य सेनानी,देशभक्त कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या 43 व्या स्मृतिदिनानिमित्त नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, इंग्लिश मीडियम मध्ये त्यांना अभिवादन करण्यात आले.
सर्वप्रथम पर्यवेक्षक मधुकर धायगुडे यांच्या हस्ते कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार समर्पित करण्यात आला. त्यानंतर प्रशालेचे सहशिक्षक संभाजी सरगर यांनी बापूसाहेबांवर लिहिलेली एक सुरेल प्रार्थना गायली. यावेळी साक्षी बाबर हिने कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या जीवन प्रवासातील विविध संकल्पना स्पष्ट केली. त्यानंतर प्रशालेतील हरित सेना विभागाच्या वतीने प्राचार्य बिभीषण माने, इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मंगल पाटील व हरित सेना विभाग सोमनाथ सपाटे यांच्या हस्ते पुण्यतिथीचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांच्यावतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले.
फोटो पाठवत आहे