कोयल मोरेचे रायफल शूटिंगमध्ये यश

मंगळवेढा तालुक्यातील शिरशी येथील कोयल किसन मोरे हिने नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या ऑल इंडिया थलसेना कॅम्पमध्ये रायफल शूटिंग या स्पर्धेत उत्कृष्ट फायरिंग करून द्वितीय क्रमांक प्राप्त करून सिल्वर पदक प्राप्त केले आहे.
ती सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे इयत्ता ९ वीत शिकत असून तिला मार्गदर्शन मकरंद अंकलगी यांनी केले आहे. या यशाबद्दल तिचे व मार्गदर्शक शिक्षकाचे समर्थ सद्गुरु बाळकृष्ण माऊली मठाचे मठाधिपती बाळासाहेब महाराज, सतिश काकडे,समाधान काकडे, प्रविण काकडे,महादेव दसवत यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.



