ऑल इंडिया एनसीसी विभागातर्फे सप्टेंबर महिन्यामध्ये दिल्ली येथे दरवर्षी ऑल इंडिया थलसेना कॅम्प चे आयोजन करण्यात येते. रायफल शूटिंग या स्पर्धेमध्ये सांगोला विद्यामंदिर चे एनसीसी कॅडेट दिल्ली येथे जातात. 2022 ते 2024 सलग तीन वर्षे विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली गाठून हॅट्रिक केली. यावर्षी देखील सर्जन ऋतिक रामचंद्र सराटे इयत्ता नववी ग, कार्पोरल अविराज सूर्यकांत कदम नववी फ, व मुलींमधून कार्पोरल कोयल किसन मोरे नववी फ हे विद्यार्थी दिल्ली येथे गेले होते.

कार्पोरल कोयल मोरे हिने उत्कृष्ट फायरिंग करून महाराष्ट्र डायरेक्ट रेट नंबर एक वर आणला व गोल्ड मेडल प्राप्त केले तसेच ऑल इंडिया मधून उत्कृष्ट फायर म्हणून द्वितीय क्रमांक प्राप्त करून सिल्वर मेडल प्राप्त केले असा डबल धमाका यावर्षी विद्यामंदिर ने दिल्ली येथे केला. 38 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूर यांच्या अंतर्गत सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे एनसीसी विभाग कार्यरत आहे 1967 सालापासून एनसीसी विभाग कार्यरत असून आत्तापर्यंत तीन ोनी एनसीसी चे काम पाहिले चौथ्या क्रमांकावरील एएनओ सेकंड ऑफिसर मकरंद अंकलगी सर यांनी 2016 पासून रायफल शूटिंगचा ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली याचाच परिणाम 2019 ला चार विद्यार्थी इंटर ग्रुप कॉम्पिटिशन साठी सिलेक्ट झाले परंतु कोरणामुळे 2019 20 21 सलग तीन वर्षे विद्यार्थी दिल्ली गाठू शकले नाहीत. मात्र 2022 साली सांगोला विद्यामंदिरच्या तीन एनसीसी कॅडेटने दिल्ली गाठली तदनंतर 2023 ला एक विद्यार्थी दिल्ली येथे स्पर्धेत जाऊन आला आणि 2024 ला त्याचीच पुनरावृत्ती करत तीन एनसीसी कॅडेट नी दिल्ली गाठली व दिल्ली गाजवली देखील. महाराष्ट्र डायरेक्ट मधून एकूण आठ जेडी मध्ये दोन जेडी सांगोला विद्यामंदिर चे होते तसेच आठ जेडब्ल्यू मध्ये एक जेडब्ल्यू सांगोला विद्यामंदिर ची होती.
सदरच्या कामगिरीबद्दल पुणे ग्रुपचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर मित्रा साहेब 38 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर एम उथ्थप्पा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर करणार विक्रम जाधव, ,सुभेदार मेजर अरुण कुमार ठाकूर, सुभेदार अण्णासाहेब वाघमारे, संस्था अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके ,सचिव म.शं. घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था सदस्य विश्वेश झपके, मुख्याध्यापक अमोल गायकवाड उपमुख्याध्यापक सौ.शहिता सय्यद उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे ,पर्यवेक्षक श्री.इंगोले व प्रदीप धुकटे , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,पी आय स्टाफ मनीष कुमार व सुदाम सर सर्वांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
Back to top button