भारत गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ आयोजित सर्व स्पर्धांचा आज पारितोषिक वितरण समारंभ

सांगोला:- भारत गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ,सांगोला या मंडळाचे हीरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व स्पर्धांचा निकाल व पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दि.17 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 8 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे.
तरी मंडळाने आयोजित केलेल्या रंगभरण, महिला भजन व गौरी सजावट स्पर्धेचे निकाल व पारितोषिक वितरण कार्यक्रमास सर्व सहभागी स्पर्धकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आलेले आहे.