सांगोला, ता.१५ : गुणवत्तेच्या आधारावर ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये काम करणारा प्राथमिक शिक्षक समाज घडवतो आहे. शासकीय यंत्रणेने शिक्षकांना केवळ ज्ञानदानाचेच काम करू द्यावे. इतर अशैक्षणिक कामे त्यांच्यावर लादू नयेत, असे विचार विधान परिषदेचे माजी सदस्य व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी व्यक्त केले.
सांगोला येथील दिपकआबा साळुंखे- पाटील प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अकराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात हे होते.या कार्यक्रमात दिपकआबा साळुंखे-पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था व सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक संघ यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी,आदर्श शिक्षक व उपक्रमशील शाळा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमास शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष मच्छिंद्रनाथ मोरे,सल्लागार समितीचे अध्यक्ष लहू कांबळे,शिक्षक नेते बब्रुवान काशीद,जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पवार,मनपा.नपा.सरचिटणीस संजय चेळेकर,राष्ट्रीय कार्याध्यक्ष तात्या यादव, गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले, प्रसिद्धीप्रमुख अशोक पवार,जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रणजीत थिटे,जिल्हा सरचिटणीस सुर्यकांत डोगे, कार्याध्यक्ष दिलीप ताटे,कोषाध्यक्ष महादेव जठार,सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन विनायक शिंदे,शिक्षक नेते जोतीराम बोंगे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष चंदाराणी आतकर,सरचिटणीस सीता नामवार, जिल्हा सोसायटीच्या व्हाईस चेअरमन राणी व्होनमाने,राज्यसंघाचे उपाध्यक्ष सुहास कुलकर्णी,जिल्हा पतसंस्थेचे संचालक गुलाबराव पाटील,शिक्षक नेते विकास साळुंखे,केशवराव घोडके,रफिक मुलाणी,संस्थेच्या चेअरमन कमल खबाले,व्हाईस चेअरमन माणिक मराठे,तालुका संघाचे अध्यक्ष मोहन आवताडे,सरचिटणीस वसंत बंडगर, महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉ.राजेश्वरी कोरे,सरचिटणीस रोहिणी भागवत,प्रवक्त्या सुमन बगले,संस्थेचे संचालक तानाजी साळे,कुमार बनसोडे,विलास डोंगरे,रफिक शेख,महादेव नागणे,संजय गायकवाड,गोविंद भोसले, पल्लवी मेणकर-महाजन,कैलास मडके, सचिव अमर कुलकर्णी,तालुका प्राथमिक शिक्षक संस्थेचे संचालक बाबासाहेब इंगोले,संजय काशीद-पाटील,सावित्रा कस्तुरे,विजयकुमार इंगवले,बाळासाहेब बनसोडे,शिक्षक नेते विश्वंभर लवटे,राजेंद्र पाटील,अंजली बिराजदार आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना दिपकआबा साळुंखे-पाटील पुढे म्हणाले की, प्राथमिक शिक्षकांवर इतर अशैक्षणिक कामे का लादली जात आहेत हे कळत नाही.त्यामुळे गुणवत्तेवर परिणाम होऊन त्याचा परिणाम पटावर होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा चांगला ठेवायचा असेल तर प्राथमिक शिक्षकांना निव्वळ ज्ञानदानाचेच काम द्यायला हवे. प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू असेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात म्हणाले की, शिक्षकांच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या राज्य शासनाने ५ सप्टेंबर रोजी संच मान्यतेबाबत चुकीचा आदेश काढला आहे.या विरोधात सर्वांना एकत्र घेऊन मोठा लढा उभारला जाईल.प्राथमिक शिक्षकांचे कुटुंबप्रमुख या नात्याने दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच योगदान दिले आहे.या कार्यक्रमात शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष मच्छिंद्रनाथ मोरे,सल्लागार समितीचे अध्यक्ष लहू कांबळे,जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पवार,संजय चेळेकर,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष चंदाराणी आतकर आदींनी विचार व्यक्त केले.या कार्यक्रमांमध्ये आदर्श उपक्रमशील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हणून बेहरे चिंचोली,बाबर चव्हाण जाधववस्ती,जवळे मुली,चिणके,लोणविरे,जुनोनी कोळा या शाळांचा सन्मान करण्यात आला.
चौकट करणे – १)
या शिक्षकांचा करण्यात आला सन्मान
साहेबराव बाबर (आलेगाव) व यशवंत मोहिते(जवळा) यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.तर अस्लम इनामदार,सरिता निंबाळकर,उत्तरेश्वर बनसोडे,दादासाहेब जगताप,दिनकर कांबळे,अर्जुन इंगोले, चंद्रकांत भोजने,राजश्री अक्कलकोटे, वंदना भोसले,विष्णू सुरवसे,तेजस्विनी दिवटे, सिद्धेश्वर जरे,नागनाथ महाजन,दादासाहेब ढेंबरे,मिनाक्षी टकले,संतोष चौगुले,महेश कसबे,गणेश सुरवसे,संजय इंगोले,पांडुरंग कर्वे,चतुरगण औताडे,सुभाष केंगार,दयानंद सूर्यवंशी,दिलीप घाडगे, उषा इंगवले,शिवाजी अडसूळ,गोरख शितोळे,शेवंता गायकवाड,सिद्धनाथ मिसाळ,दत्तात्रय डोंगरे,म्हाळप्पा लवटे यांना गौरविण्यात येणार आहे.
२) लकी ड्रॉ योजनेतून यांना मिळाले बक्षीस
या कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या शिक्षकांसाठी में. गजानन रत्नपारखी ज्वेलर्स, मंगळवेढा व सांगोला यांच्या वतीने भव्य लकी ड्रॉ योजनेचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये प्रथम क्रमांकाचे सॅमसंग मोबाईल हे बक्षीस सरिता शंकर निंबाळकर यांना मिळाले. तर हिरो सायकल-प्रतिज्ञा प्रमोद कोडक,मिक्सर- समाधान कांबळे,पैठणी-विवेकानंद ऐवळे, छल्ला-गजानन मोहिते,नथ-यशवंत मोहिते,चांदी पेन- ऋतुराज घाडगे यांना ही बक्षिसे मिळाली आहेत.
चौकट ३) थकीत शिक्षक मानधनासाठी तात्काळ तहसीलदार यांना फोन
मराठा आरक्षण संदर्भात सर्वेक्षण करण्याकरिता तालुक्यातील सुमारे २८० शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती.या कामाचे शिक्षकांचे मानधन थकले असून त्यासाठी वारंवार महसूल प्रशासनाला विनंती करून ही हे मानधन प्राप्त होत नसल्याचे शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष सुहास कुलकर्णी यांनी सांगितले. यावर माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांनी तात्काळ तहसीलदार संतोष कणसे यांच्याकडे दूरध्वनी वरून याबाबत विचारणा केली.या कामाचे शिक्षकांचे थकीत मानधन सुमारे पाच लाख चार हजार रुपये पुढील आठवड्यामध्ये वितरित केले जाईल असे तहसीलदार यांनी यावेळी सांगितले.
चौकट ४) शिक्षकांच्या कायम ठेवीवर १४ टक्के लाभांश देणार
संस्थेच्या सभासदांच्या कायम ठेवीवर १४ टक्के लाभांश देणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. शिवाय कर्ज मर्यादा वाढवून १२ लाख रुपये करण्यात आली. सभासदांना अधिकाधिक कर्जाचा लाभ मिळावा यासाठी व्याजदर ७.२० वरून ८.४० टक्के एवढे वाढविण्यात आले आहे. तसेच संस्थेच्या इमारतीसाठी कायम ठेवीतून निधी घेण्याचा ठराव यावेळी करण्यात आला.