कु.अंजोर लाटणे आणि कबीर (आर्यन) लाटणे उच्च शिक्षणासाठी अमेरिकन विद्यापीठांमध्ये प्रवेशित

कोष्टी गल्ली सांगोला येथील सौ.मंगल शशिकांत लाटणे आणि श्री. शशिकांत गंगाधर लाटणे यांचे नात कु.अंजोर ही पदव्युत्तर शिक्षणाकरिता मास्टर ऑफ सायन्स इन डेटा सायन्स करिता युनिव्हर्सिटी ऑफिस विस्कॉन्सिन , मिलवाकी येथे प्रवेशित झाली आहे. कुमारी अंजोर हिने यापूर्वी पंजाब मधील लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, जलंधर येथे बी. टेक केले आहे.
त्यानंतर कॉग्निजंट या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये ती रुजू झाली होती. या कंपनीमध्ये एक वर्ष नोकरीचा अनुभव घेतल्यानंतर कु. अंजोर पदव्युत्तर शिक्षणाकरिता अमेरिकेतील नामांकित विद्यापीठामध्ये सध्या प्रवेशित झाली आहे.याचबरोबर कबीर (आर्यन) लाटणे याने एमआयटी, पुणे येथे बी.टेक केले आहे.
त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडा मध्ये मास्टर ऑफ सायन्स इन कम्प्युटर सायन्स या कोर्स करिता तो प्रवेशित झाला आहे. कु. अंजोर आणि कबीर यांचे सांगोला येथील त्यांची आजी सौ. मंगल शशिकांत लाटणे आणि आजोबा श्री. शशिकांत गंगाधर लाटणे तसेच आत्या सौ.वैशाली, सौ.रुपाली व सौ. दिपाली यांच्याकडून अभिनंदन आणि कौतुक करण्यात आले आहे.
याशिवाय सांगोला येथील श्रीमती सुमन कांबळे, डॉ.संजीवनी ताई केळकर, ऍड. भारत बनकर, श्री. रमेश अण्णा देशपांडे आणि डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्याकडून त्यांचे विशेष अभिनंदन आणि कौतुक करण्यात आले आहे. कु. अंजोर व कबीर हे कला व वाणिज्य महाविद्यालय, चाकण येथील प्राचार्य डॉक्टर राजेश लाटणे व सौ.रचना लाटणे यांची कन्या व पुत्र आहेत.
कु. अंजोर व कबीर यांच्यावर सांगोला तसेच परिसरातील सर्व थरातील नागरिक, हितचिंतक, नातेवाईक व मित्रपरिवार यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुक करण्यात येत आहे.