महाराष्ट्र

महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव निमित्त रविवारपासून सांगोला येथे विविध कार्यक्रम

महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवानिमित्त समस्त वीरशैव लिंगायत समाज सांगोला शहर व तालुका यांच्या वतीने रविवार दि. २७ एप्रिल ते गुरुवार दि.१ मे या दरम्यान खंडोबा मंदिर व मारुती मंदिर मेनरोड, सांगोला येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महात्मा बसवेश्वर युवक संघटनेचे अध्यक्ष संदेश पलसे यांनी दिली.

रविवार दि. २७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता लहान गट (इयत्ता पहिली ते चौथी) व मोठा गटासाठी (इयत्ता पाचवी ते दहावी) चित्रकला रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. सायंकाळी ६ वा. इयत्ता पहिली ते चौथी लहान गट व इयत्ता पाचवी ते दहावी मोठा गटासाठी वैयक्तिक डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत. सोमवार दि. २८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता महिलांसाठी व मुलींसाठी फनी गेम्स आयोजित करण्यात आलेले आहेत. सर्व स्पर्धांसाठी रोख रक्कम स्वरूपात बक्षीसेही देण्यात येणार आहेत.तसेच मंगळवारदि.२९ एप्रिल रोजी कु. सृष्टी सुनील लिगाडे हिचे सायं. ठीक 7.30 वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहेत

बुधवार दि.३० एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता मोटरसायकल रॅली काढण्यात येणार असून सकाळी १० वाजता पुष्पवृष्टी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी ४ वाजता समस्त वीरशैव महिला भजनी मंडळ यांची भजन सेवा संपन्न होणार आहे. सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ बुधवार दि. ३० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आलेला असून गुरुवार दि.१ मे रोजी एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे या सर्व कार्यक्रमास शहरातील व तालुक्यातील वीरशैव लिंगायत समाजातील बंधू भगिनीनी व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महात्मा बसवेश्वर युवक संघटना व वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आले आहे

नाव नोंदणीसाठी मो. ९७६४६४२१२२, ९५६१५३७९७२ ९६६५४३५८३१, ९७६४०३१९३२, ९१७२३७१०४४, ९५०३४९२२८८ यांच्याशी संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button