सांगोला विद्यामंदिरमध्ये इ.१२ बोर्ड व स्पर्धा परीक्षा गुणवंताचा सत्कार संपन्न

सांगोला -(प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला फेब्रु.२०२४ मध्ये घेण्यात आलेल्या एच.एस.सी बोर्ड परीक्षेमधील शास्त्र,कला व वाणिज्य शाखेतील ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणारे ४ व तीन्ही शाखेतील प्रथम तीन क्रमांकाचे व ,एम.एच.टी.सी.ई.टी मधील ९० पर्सेंटाइल पेक्षा जास्त गुण असणारे २२ व इन्स्पायर स्कॉलरशिपसाठी निवड झालेल्या ११ गुणवंत विद्यार्थ्यी व भूगोल विषयांमध्ये ९९ गुण प्राप्त विद्यार्थ्याचा पालकांसमवेत प्रमुख पाहुणे प्रा. डॉ.प्रकाश बनसोडे यांचे शुभहस्ते व संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला
यावेळी व्यासपीठावर संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापक शहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, प्रदीप धुकटे, मच्छिंद्र इंगोले उपस्थित होते. सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष गुरूवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास गुणवंत विद्यार्थी व पालक, प्रमुख पाहुणे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यांनंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा मेडल, गुलाब पुष्प व सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थेकडून १००० रुपये रोख रक्कम बक्षीस देऊन पालकांसमवेत सत्कार करण्यात आला. यावेळी पालक व गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज शिस्त, गुणवत्ता,व अध्यापकांच्या अध्यापनाविषयी गौरवउद्गार काढले.यावेळी ज्युनिअर कॉलेजमधील सर्व मार्गदर्शक विषय शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुलाब पुष्प व उपमुख्याध्यापक शहिदा सय्यद यांचे तर्फे देण्यात आलेली भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमासाठी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक शहिदा सय्यद यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.शिवशंकर तटाळे,प्रा.अश्विनी जालगिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे यांनी केले.
————————
शाळा महाविद्यालयामध्ये मिळालेले विषयाचे मूलभूत ज्ञान पुढच्या वाटचालीसाठी खूप महत्त्वपूर्ण असते ते मला सांगोला विद्यामंदिरच्या रूपाने मिळाले त्यामध्ये प्राध्यापक पी.सी. झपके सरांनी जीवशास्त्र विषयाचे केलेले अध्यापन आजही प्रभावी वाटते. त्याच पद्धतीने तुम्हाला या ज्ञानमंदिरात मौलिक ज्ञान प्राप्त झाले आहे त्याद्वारे कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतून पुढे विविध क्षेत्रात असणारी संधी लक्षात घेऊन आपण प्रगती करावी.त्याचबरोबर संशोधन व नाविन्यपूर्ण शाखांमध्ये आपण आपले योगदान देऊन योग्यता सिद्ध करावी.
प्रा.डॉ.प्रकाश बनसोडे, प्रमुख पाहुणे
———————————————
–क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हीही विद्यामंदिरमध्ये हातात हात घालून एकत्र नांदतात.त्यामुळेच गुणवत्तेमध्ये एवढा नावलौकिक आहे. यासाठी संस्था, शाळा ,शिक्षक व विद्यार्थी म्हणून तुमचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.त्यामुळेच सांगोला विद्यामंदिर मध्ये इ.१२ परीक्षा व स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंताचा गौरव होत आहे. बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही प्रेरणा घ्यावी व उज्ज्वल यश संपादन करावे.
प्रा.प्रबुद्धचंद्र झपके. अध्यक्ष,सा.ता.शि.प्र.मंडळ, सांगोला