सावे माध्यमिक विद्यालयात बालविवाह निर्मूलन व लेक वाचवा कार्यक्रम संपन्न.

सावे माध्यमिक विद्यालयात युनिसेफ संघटनेच्या संयुक्त विद्यमानाने अस्तित्व समाज विकास व संशोधन संस्था या संस्थेमार्फत विद्यालयात बालविवाह विरोधी लढा व लेक वाचवा याविषयी कार्यशाळा पार पडली.
या कार्यक्रमासाठी अस्तित्व समाज विकास व संशोधन संस्था या संस्थेच्या श्रीमती गडहिरे मॅडम व श्रीमती निकिता पवार मॅडम उपस्थित होत्या. सर्वप्रथम विद्यालयाच्या वतीने गडहिरे मॅडम व निकिता पवार मॅडम यांचे स्वागत व सत्कार इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कुमारी सुप्रिया देवकते व सानिका लवटे यांनी श्रीफळ व गुलाब फूल देऊन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री शेळके सर यांनी केले त्यानंतर निकिता पवार मॅडम व गडहिरे मॅडम यांनी बालविवाह निर्मूलन व बालविवाहाचे दुष्परिणाम विद्यालयातील विद्यार्थ्यांना सांगून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले .त्यामध्ये बालविवाह विषयी त्यांनी विद्यार्थ्यासमवेत गीत सादर केले व काही इतर प्रात्यक्षिके करून घेतली. अशाप्रकारे बालविवाह विरोधी लढा व बालविवाह निर्मूलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शेळके सर ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.