बुध्देहाळ येथील शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संतोष काळे तर उपाध्यक्षपदी गोविंद लवटे यांची बिनविरोध निवड जाहीर

सांगोला वार्ताहर बुध्देहाळ येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संतोष जगन्नाथ काळे यांची शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी गोविंद लवटे यांची बिनविरोध निवड जाहीर झाली
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या बुध्देहाळ येथील पालक सभेत ही निवड जाहीर करण्यात आली त्यांच्या निवडीने सर्वञ अभिनंदन होत आहे
ग्रामस्थ व शाळेच्या वतीने त्यांच्या निवडीचे स्वागत करुन त्यांचा सत्कार करण्यात आला शेकापचे नेते भाई डॉ बाबासाहेब देशमुख यांनी दूरध्वनी द्वारे त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले शैक्षणिक सामाजिक कार्यात अग्रेसर राहून गावाच्या विकासासाठी सक्रिय राहावे असे त्यांनी आव्हान करुन भावी कार्यास शुभेच्छा दिल्या



