हलदहिवडी विद्यालयाची ऋतुजा चंदनशिवे ही आठवी स्कॉलरशिप परीक्षेत S.C प्रवर्गातून सांगोला तालुक्यात प्रथम

हलदहिवडी विद्यालय व ज्युनि. कॉलेज ता सांगोला जि. सोलापूर विद्यालयाचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षेत कुमारी *ऋतुजा महादेव चंदनशिवे* हिने ग्रामीण भागातून एस. सी .प्रवर्गातून जिल्ह्यात सातवा व सांगोला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. व ही विद्यार्थीनी जिल्हा गुणवत्ता यादीत शिष्यवृत्तीधारक म्हणून पात्र झाली आहे.
त्याबद्दल प्रशालेमध्ये तिचा शाल, हार, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. वरील यशाबद्दल यशस्वी विध्यार्थी, व मार्गदर्शक शिक्षक प्रकाश गळवे, मुसाअल्ली काझी व सर्व शिक्षक यांच्ये अभिनंदन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश येडगे साहेब, ज्येष्ठ संचालक विश्वनाथ (नाना )चव्हाण, विलास (बापू) येडगे, अपर्णा येडगे मॅडम मुख्याध्यापक रामचंद्र जानकर यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, विद्यार्थिनी व ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यालयाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.