सांगोला येथे संपुर्णतःअभियानाचा शुभारंभ

सांगोला(प्रतिनिधी):- संपुर्णतःअभियानाचा शुभारंभ केंद्र शासन निती आयोगाच्या सन्माननीय पदाधिकारी सायली मानकिकर व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे साहेब यांचे शुभ हस्ते पंचायत समिती सांगोला येथे 4जुलै रोजी संपन्न झाला
संपुर्णत: अभियान कार्यक्रमाचे वेळी सहाय्यक गट विकास अधिकारी श्री.मिलींद सावंत यांनी उपस्थित कर्मचारी, अधिकारी ह्यांना संपूर्णतः अभियान या बद्दल मार्गदर्शन केले. आणि येत्या 30 सप्टेंबर पर्यंत आपल्याला कसे इंडिकेटर्स साध्य करता येतील याविषयी मार्गदर्शन केले.
भारत सरकारच्या निती आयोग आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत शिक्षण, आरोग्य, कृषि, आयसीडीएस,एनआरएलएआदि विकास क्षेत्रातील चाळीस निर्देशांक उंचवण्यावर भर देण्यात आला आहे. त्यापैकी मृदा आरोग्य पत्रिका, महिला सबलीकरण, आरोग्य, पूरक पोषक आहार, शिक्षण इत्यादि महत्त्वाच्या *सहा निर्देशकांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्राधान्याने कार्यक्रमांची अंमलबजावणी 4 जुलै ते 30 सप्टेंबर या कलावधीत करायची आहे.* त्या अनुषंगाने निती आयोग, जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत पंचायत समिती सांगोला येथे संपुर्णत: अभियान उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला दिनांक 4 जुलै रोजी सकाळी 11 ते 1 मध्ये पार पाडण्यात आला. .
तसेच निती आयोग समन्वयक सायली माणकीकर यांनी संपूर्णतः अभियानासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी आरोग्य समुदाय अधिकारी , आशा वर्कर्स, अंगणवाडी कार्यकर्त्या, बाल विकास अधिकारी, गट शिक्षणधिकारी, कृषी अधिकारी, उमेद बचत गट, ब्लॉक मिशन मॅनेजर यांच्या सहभागाने या उपक्रमांची इंडिकेटर्स बद्दल देखील माहिती देण्यात आली. अभियान शुभारंभ प्रसंगी सेल्फी पॉइंट मध्ये फोटो काढून तसेच संकल्प प्रतिज्ञा घेऊन करण्यात आला.
तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री. फुले आणि व तोडकरी ह्यांनी देखील सांगोला तालुका ची झालेली निवड आणि निती आयोगाने जे काही इंडिकेटर्स साध्य करण्यासाठी लक्ष दिले आहेत त्या बद्दल सगळ्यांना मार्गदर्शन केले.
अभियान चे शुभारंभ यशस्वी होण्यासाठी , गटातील संबंधित विभागातील सर्व कर्मचारी, अधिकारी, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, आशा सेविका, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका,आय.सी.आर.पी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन अनुजा गावडे, ए.बी.पी.फेलो यांनी केले.
या वेळी सांगोला विद्यामंदिर येथील विद्यार्थ्यांकडून संपुर्णतः अभियानाची रॅली काढून अभियानात सहभाग नोंदवून प्रशासकीय कामाचा संदेश देण्यात आला या कामी मुख्याध्यापक अमोल गायकवाड व शिक्षकांचे सहकार्य मिळाले.विद्यामंदिर सांगोला चे विद्यार्थी असे एकूण 250 लोकांनी आपला सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.