sangola

न्यू इंग्लिश स्कूलचे विविध स्पर्धा परिक्षेत घवघवीत यश

HTML img Tag Simply Easy Learning    

 

सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॅालेज या नामांकित प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परिक्षेत घवघवीत यश प्राप्त केले.याबद्दल यशस्वी विद्यार्थांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

 

यावेळी व्यासपीठावर सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री विठ्ठलराव शिंदे सर,न्यू इंग्लिश स्कूल चे प्राचार्य प्रा.केशव माने,उपप्राचार्य प्रा.संतोष जाधव,संस्थासंचालक डॅा.अशोकराव शिंदे,प्रा.दिपकराव खटकाळे,प्रा.जयंत जानकर,पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध,दथरथ जाधव सर,तात्यासाहेब इमडे सर,सांस्कृतिक प्रमुख सौ.स्मिता इंगोले मॅडम तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक आदी उपस्थित होते.

 

सर्वप्रथम विज्ञान प्राविण्य परीक्षा २०२४ मध्ये पात्र झालेले विद्यार्थी इयत्ता सहावीतील श्रावणी संतोष ठेंगील,
सायली कृष्णा हजारे,संस्कृती नवनाथ कटरे,गौरी संतोष कोडग,अक्षरा किसन गुंगे,अथर्व महादेव माने,तृप्ती सुनिल शिनगारे,तनुष्का विशाल शिनगारे,शिवम आण्णासो जाधव,पवन नवनाथ राऊत,अनुष्का विकास येलपले,श्रेया राजेंद्र मुकरे,शरयू सचिन भंडारे,ज्ञानी अमर जाधव तसेच इयत्ता नववी मधील सई जगन्नाथ जाधव,संचिता संजय देशमुख,केतन नागेश दाते,गणेश शिवाजी आदलिंगे,संजोग संतोष औरादे,अमर अनिल कोळी,विदाद जमीर शेख,समृद्धी विष्णू माळी,शितल गणेश लिंगे,सोहम सचिन माळी या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.याचबरोबर मार्गदर्शक शिक्षिका खडतरे एस.डी मॅडम,गीता गुळमिरे मॅडम,स्मिता इंगोले मॅडम,अनुराधा लिगाडे मॅडम यांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.यानंतर सूर्योदय फॅांऊडेशन सांगोला यांच्या मार्फत दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रशालेतील निलोफर मुजावर मॅडम यांचा सन्मान संस्थासचिव विठ्ठलराव शिंदे सर यांच्या हस्ते करण्यात आला.

यानंतर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल सावली हनुमंत गाडेकर हिचा व मार्गदर्शक शिक्षक सचिन हजारे सर यांचाही सन्मान करण्यात आला.सदरच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चैतन्य फुले सर यांनी केले तर आभार अविनाश सरगर सर यांनी मानले.

सर्व गुणवंतांच्या या यशाबद्दल सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॅा.अनिकेत देशमुख,सचिव विठ्ठलराव शिंदे सर, संस्थासंचालक डॉ.अशोकराव शिंदे,प्रा.दीपकराव खटकाळे व प्रा.जयंतराव जानकर,यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!