sangola

जीवन जनतेसाठी समर्पित करणारे नेतृत्व हरपले-आमदार शहाजी बापू पाटील

कै. पांडुरंग मिसाळ यांना चिनके येथे श्रद्धांजली अर्पण

HTML img Tag Simply Easy Learning    

जीवन जनतेसाठी समर्पित करणारे नेतृत्व म्हणजे पांडुरंग मिसाळ यांचे होते ते आता हरपले व सुभाष नाना नंतर पांडू एक महत्त्वाचा आमचा माणूस होता. गावाची प्रगती व्हावी यासाठी मान नदीला कॅनलचा दर्जा द्या अशी आग्रही मागणी सातत्याने त्याची होती ती पूर्ण झाली व मान नदीवर आपण लवकरच पूल उभारणार असून त्यास पांडुरंग मिसाळ यांचे नाव दिले जाईल. तसेच चळवळीतला कार्यकर्ता, मायाळू गमावला या शब्दात आमदार शहाजी बापू पाटील यांनी चिनके ता. सांगोला येथे पांडुरंग मिसाळ यांच्या निधनाबद्दल तिसऱ्या दिवसाच्या विधी प्रसंगी श्रद्धांजली वाहताना शहाजी बापूंनी मत व्यक्त केले.

समोर जनसमुदाय बघूनच पांडू मिसाळ यांची लोकप्रियता कळते व आपला पक्ष व नेता फक्त शहाजीबापू असा मानणारा पांडू होता. झपके कुटुंबीय व सा. ता.शि. प्र. मंडळ सांगोला यांच्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो असे प्रा. पी. सी. झपके यांनी श्रद्धांजली प्रसंगी सांगितले. सुरुवातीस आमचा जिवाभावाचा दोस्त गमावला व बलवडी ग्रामस्था तर्फे महादेव शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली. चळवळीचा नेता व चिनके सोसायटीचे चेअरमन, मा. उपसरपंच पांडुरंग मिसाळ यांच्या अकाली जाण्याने सांगोला तालुक्याचे हानी झाली व चिनके गावचे नाक गेले व दुसऱ्याला सल्ला देणारे नेतृत्व हरवले या शब्दात भाजप नेते श्रीकांत दादा देशमुख यांनी श्रद्धांजली प्रसंगी सांगितले. कोर्ट, कचेरी कामासाठी कमीत कमी पैशात काम करा असे पांडू सांगायचा त्यामुळे त्याच्या जाण्याने फार मोठी हानी झाली या शब्दात एडवोकेट उदय बापू घोंगडे यांनी श्रद्धांजली वाहिली.

यावेळी शिवसेना नेते सागर दादा पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन रमेश जाधव, पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले, युवा नेते गुंडा दादा खटकाळे, विविध पक्षाचे नेते मंडळी यामध्ये सुनील चौगुले, शिवाजी घेरडे, विजय दादा शिंदे, योगेश खटकाळे, अरविंद केदार, चेअरमन भिकू बाबर, दगडू बाबर, डॉक्टर परेश खंडागळे, दादासो वाघमोडे, उत्तम पाटील, राजू बंडगर, बारा बापू येल्पले, प्रकाश सोळशे, बबन कुरे, रामा दबडे, राजू पाटील, अजय सरगर, उत्तम सरगर, महादेव पवार, सतीश बाबर, प्रा. बाबर, मधुकर पवार, सुनील भोरे, मधुकर पवार, महावितरण अधिकारी हनुमंत बनसोडे, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन सदस्य, चिनके ग्रामस्थ उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!