कोळा येथील विठ्ठल कोळेकर यांचे निधन..

सांगोला तालुक्यातील कोळा येथील राजमाता पतसंस्थेचे संचालक दत्त कृषी केंद्राचे संस्थापक मालक उत्कृष्ट प्रगतशील शेतकरी विठ्ठल शंकर कोळेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. निधना समय त्यांचे वय ५५ वर्ष होते.
कोळा विकास सेवा सोसायटीचे विद्यमान चेअरमन तुकाराम तात्या कोळेकर प्रगतशील शेतकरी दादासो शंकर कोळेकर, निवृत्ती शंकर कोळेकर यांचे बंधू तसेच राजमाता पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन कुंडलिक आलदर सर यांचे मावस भाऊ तसेच युवा नेते संतोष कोळेकर यांचे चुलते होत. विठ्ठल कोळेकर यांच्या अकाली निधनाने कोळा पंचक्रोशीत शोककळा पसरली सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली सुना जावाई  असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा २० सप्टेंबर वार शुक्रवार रोजी सकाळी आठ वाजता बानूरगड रोड कोळेकर वस्ती कोळे येथे होणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button