सांगोला महाविद्यालय सांगोला व डॉ गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सांगोला महाविद्यालयामध्ये डॉ.धनाजी काळे (Institute of Chemical Technology CICT), Mumbai यांचे व्याख्यान मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11.00 वा संपन्न झाले. यावेळी बोलताना डॉ. काळे यांनी एकूण आपल्या देशात संशोधनाची स्थिती इतर देशांमधील संशोधनाची स्थिती यामधील आकडेवारीनुसार फरक सांगितला. यामध्ये आपल्या देशाचा संशोधना मधील प्रगतीचा आलेख खूपच खाली आहे. याचा आपण नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार करून म्हणजेच आपल्या देशात तरुणांना संशोधनांमध्ये खूप संधी आहेत असे सांगितले.
संशोधनांमध्ये भारत सरकार महाराष्ट्र सरकार यांच्याकडून तसेच मराठी विज्ञान परिषदेकडून मोठ्या प्रमाणात अनुदान मिळते. या अनुदानातून कित्येक विद्यार्थ्यांनी पीएच.डी पदवी मिळवून मोठे संशोधन केलेले आहे असे उदाहरणासहित विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगोला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांनी समाजात संशोधन कसे तयार होतात. संशोधनाची सुरुवात माणसाच्या गरजेतून उत्पन्न होते तिचात आपण सूक्ष्मात-सूक्ष्म अभ्यास करून संशोधक निर्माण होतात असे सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी व प्रा. डॉ. रमेश टेंभुर्णे यांचे मोलाचे सहकारी लाभले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विजयकुमार गाडेकर यांनी केले तसेच आभार प्रा.डॉ.राजेंद्र सूर्यवंशी यांनी मानले व सूत्रसंचालन प्रा.संतोष कांबळे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी प्राध्यापक शिक्षिकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.