रोटरी लोक सांगोला यांच्या वतीने छ. शिवाजीनगर गणेशोत्सव मंडळ सांगोला येथे महिलांसाठी खेळ पैठणीचा होम मिनिस्टर हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.विकास देशपांडे यांच्या हस्ते स्टेजची पूजा करून करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये ४०० महिलांनी भाग घेतला. M
या कार्यक्रमांमध्ये विविध प्रकारचे खेळ, प्रश्न उत्तरे,उखाणे इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या.या कार्यक्रमांमध्ये महिलांनी खेळाचा मनसोक्त आनंद लुटला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अनुपमा गुळमीरे यांनी केले.या कार्यक्रमास प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास पैठणीचे बक्षीस देण्यात आले.
या कार्यक्रमास रो.इंजि.विलास बिले रो.इंजि.मधुकर कांबळे, रो.इंजि.रमेश जाधव,रो.इंजि.अशोक गोडसे आणि शिवाजीनगर गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी,सदस्य व बहुसंख्य लोक उपस्थित होते.