ऑलम्पिक वीर सचिन खिलारी यांचा सत्कार जवळा ग्रामपंचायत व आदर्श गणेश तरुण मंडळ भोपसेवाडी यांच्यावतीने संपन्न

पॅरिस येथे नुकत्याच पार पडलेल्या प्यारा ओलंपिक स्पर्धेमध्ये रोप्य पदक मिळवून देशाची मान उंचावणारे जिगरबाज खेळाडू सचिन खिलारी यांचा सत्कार जवळा ग्रामपंचायत व आदर्श गणेश तरुण मंडळ व नरळे परिवार भोपसेवाडी यांच्या वतीने नुकताच संपन्न झाला.

पॅरिस येथे पार पडलेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये गोळा फेक या क्रीडा प्रकारामध्ये मूळचे आटपाडी तालुक्यातील करगणी येथील असणारे क्रीडापटू सचिन खिलारी यांनी रोप्य पदक मिळवून देशाची मान उंचावली आहे. हे पदक तब्बल 51 वर्षानंतर महाराष्ट्रास तर तब्बल 31 वर्षानंतर भारतात मिळाले आहे. यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी सचिन खिलारी याचा  सत्कार केला. सचिन खिलारी यांच्या या कामगिरीमुळे त्यांची जिल्हा क्रीडा अधिकारी वर्ग एक पदी थेट निवड करण्यात आली आहे. असे असामान्य कर्तृत्व करणाऱ्या या खेळाडूचा मान आणि सन्मान जवळा ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच,सदस्यांच्या व ग्रामस्थांच्या वतीने माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पियुष दादा साळुंखे पाटील यांच्या हस्ते दिमाखात  जवळा येथे संपन्न झाला.

तसेच भोपसेवाडी येथे आदर्श गणेश तरुण मंडळ व नरळे परिवार व भोपसेवाडी ग्रामस्थांच्या वतीने संपन्न झाला. भोपसेवाडी येथे सचिन खिलारी या जिगरबाज खेळाडूचे आगमन होताच फटाक्यांची आताशीबाजी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. महिला भगिनींकडून सचिन खिलारे यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले. व सचिन खिलारी यांच्या शुभहस्ते गणेशाची आरती करण्यात आली.याप्रसंगी युवा नेते डॉक्टर पियुष दादा साळुंखे पाटील हेही उपस्थित होते.

आपले मनोगत व्यक्त करीत असताना सचिन खिलारी यांनी आपल्या या यशापर्यंत पोहोचतानाचा खडतर प्रवासाचे वर्णन करून तरुणांनी अधिकाधिक खेळाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. दक्षिण आफ्रिका,चीन, पॅरिस,जपान या ठिकाणी त्यांना आलेल्या अनुभवांचे त्यांनी वर्णन करून अत्यंत प्रतिकूल आणि खडतर परिश्रम घेऊन या यशास कशी गवसणी घातली  हे स्पष्ट केले.

याप्रसंगी प्रा. अनिल नवत्रे व डॉक्टर पियुष दादा साळुंखे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून सचिन खिलारी यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे नियोजन आदर्श गणेश तरुण मंडळ भोपसेवाडी, नरळे परिवार व भोपसेवाडी ग्रामस्थांकडून अत्यंत देखणे करण्यात आले होते.

याप्रसंगी माजी सरपंच चंद्रकांत नरळे, माजी तंटामुक्त अध्यक्ष किसन नरळे, अशोक नरळे,हनुमंत नरळे, सुरेश गवंड, दीपक नरळे, संजय नरळे, राहुल माळी, श्रीकांत तोडकर, सागर नरळे, सचिन नरळे,  बंडू नरळे, लक्ष्मण करांडे, व भोपसेवाडी ग्रामस्थ महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शंकर दुधाळ यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button