कोळा परिसरात शेतकऱ्याचा दूध उत्पादन खर्चाचा मेळ बसेना~ तुकारामदादा आलदर

सांगोला तालुक्यातील कोळा परिसरासह राज्यात दूध व्यवसायाला उभारी देण्यासाठी शासनाने गायीच्या दुधाला १ जुलैपासून प्रति लिटर ५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला अंमलबजावणी सुरू नसल्याने शेतकरी वर्गात नाराजी असून यामुळे दूध व्यवसायाला ऊर्जितावस्था प्राप्त होईल असे चित्र होते. मात्र, पशुखाद्याचे व चाऱ्याचे दर वाढले आहेत. शिवाय अद्याप अनुदानही मिळाले नाही. त्यामुळे एकूण खर्च व उत्पादन यांचा मेळ बसत नसल्याने दूध उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे.यामुळे उत्पादकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून पशुखाद्याच्या दरावर नियंत्रण राहिले नाही यामुळे शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या कानावर हा विषय घातला असून तातडीने आवाज उठवून उपाययोजना कराव्या शेतकरी वर्गाला दिलासा द्यावा असे मत कोळे गावचे शेकाप चे ज्येष्ठ नेते तुकाराम दादा आलदर पुढारी यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना तुकाराम दादा आलदर म्हणाले ग्रामीण अर्थ व्यवस्थेचा कणा म्हणून दूध व्यवसायाकडे बघितले जाते. काही भागांत अनेक वर्षांपासून शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जात होता. टेंभू, योजनांचे पाणी शिवारात फिरल्यामुळे दुग्ध व्यवसायासाठी परराज्यातून गायी, म्हैशी खरेदी करून तरुण शेतकऱ्यांनी या व्यवसायामध्ये बस्तान बसविले आहे.गरजेचा असणारा हिरव्या चाऱ्याची उपलब्धता झाल्याने आणि दूध व्यवसायातून पैशांची चांगली आवक होत असल्याने जोडधंद्याची जागा व्यवसायाने घेतली आहे. लाखो रुपयांची गुंतवणूक या व्यवसायामध्ये झालेली असून,जानेवारी, फेब्रुवारीसाठी शासनाने गायीच्या दुधाला अनुदान जाहीर केले होते. त्यांनतर पुन्हा जुलै पासून अनुदानाची घोषणा केली आहे.गायीच्या दुधाला अनुदान मिळणार असल्याने उत्पादकांच्या हातात ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ साठी प्रति लिटर ३५ रुपये पडणार आहेत. मात्र, शासनाने अनुदान जाहीर करून दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे, तरीही अद्याप उत्पादकांना अनुदान मिळाले नसल्याचे चित्र आहे शेतकरी वर्ग सांगत आहे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे असे तुकाराम दादा आलदर यांनी शेवटी सांगितले…
.
—————————————————————-
सध्या पशुखाद्यांच्या दरात वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत दुधाला मिळणारा कमी दर आणि उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नसल्याने दूध उत्पादकांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे. तसेच शासनाच्या धोरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
~ तुकाराम दादा आलदर ,शेकाप ज्येष्ठ नेते कोळा
—————————————————————-