तालुक्यातील सुमारे २०० सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाला दिला निरोप

सांगोला- गणपती बाप्पा मोरया , पुढल्या वर्षी लवकर या , च्या जयघोषात रंगीबेरंगी फुलांनी, फुग्यांनी सजावट केलेल्या ट्रॅक्टरमधून गणरायाची मिरवणूक काढून गुलाल, केशरी रंगाची मुक्त उधळण करीत फटाके फोडून ढोल, ताशा, बँड, पारंपरिक वाद्य वाजवून महिलांनी टीपरी नृत्य , लेझीम, बलगा नृत्य, माझ्या पप्पांनी गणपती आणला.. आदी हिंदी मराठी गाण्यावर ठेका धरुन सांगोला शहर व तालुक्यातील सुमारे २०० सार्वजनिक गणेश मंडळांनी लाडक्या गणरायाला मोठ्या भक्ती भावाने निरोप दिला.गणेश विसर्जन मिरवणुका कोणत्याही अनुचित प्रकाराविना शांततेत पार पडल्याने पोलीस प्रशासनाने सुटकेचा निःश्वास घेतला आहे.
सांगोला शहर व तालुक्यातील सुमारे २७० सार्वजनिक गणेश मंडळाने ५ फुटापासून ते २० फुटापर्यंत विघ्नहर्ता गणरायाच्या विविध आकार रूपातील आकर्षक मुर्त्यांच्या प्रतिष्ठापना केल्या होत्या. गणपती आगमन ते विसर्जनापर्यंत गेले १० दिवस सांगोला शहर व तालुक्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम महाप्रसादाचे आयोजन करून भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा केला.पोलीस प्रशासन व गणेश मंडळाच्या नियोजनानुसार सार्वजनिक गणेश मंडळांनी पाचव्या, सातव्या दिवसापासूनच गणेश विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या मात्र मंगळवारी अनंत चतुर्थीदिवशी सांगोला शहरातील बहुतांशी सार्वजनिक गणेश मंडळांनी ढोल, ताशा, हलगी बँड वाद्य वाजवित गुलाल केशरी रंगाची उधळण ,फटाके फोडून जल्लोषात मिरवणुका काढून आपापल्या सोयीनुसार लाडक्या गणरायाला निरोप दिला तर घरगुती गणपतीचे शहरातील नवीन बाजार पटांगण, कुंभार गल्ली ,नगरपरिषद कार्यालयाच्या पाठीमागील विहिरीत विसर्जन केले. मिरवणुकी दरम्यान पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे यांनी पोलीस अधिकारी कर्मचारी व होमगार्डचा सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला होता.
—————————————————————–
चौकट – सांगोला नगरपरिषद कार्यालयासमोर नगरपरिषदेच्या वतीने कार्यालयीन अधीक्षक स्वप्निल हाके , कर निरीक्षक रोहीत गाडे,आरोग्य निरीक्षक विनोद सर्वगोड, सहाय्यक प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे , कर निरीक्षक सचिन पांडे , लेखापाल धनाजी साळुंखे , जितेंद्र गायकवाड ,अमित कोरे , विद्युत अभियंता प्रभाकर कांबळे यांनी शहर व उपनगरातील सार्वजनिक गणेश मंडळांचे स्वागत करुन मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केल्या जात होता