नुकत्याच पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये 17 वर्षे, 19 वर्ष वयोगटातील मुलांनी व 19 वर्ष वयोगटातील मुलींनी प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत एकाच कॉलेजचे तीनही संघ विभागीय पातळीवर जाणाऱ्या कॉलेजचा मान सोलापूर जिल्ह्यात फक्त आणि फक्त न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोलाला लाभला आहे. यामुळे फक्त सोलापूर जिल्ह्यातच नाही तर पुणे विभागामध्ये ही न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोलाच्या तीनही टीम बाबत एक वेगळीच छाप निर्माण झाली आहे.. या सर्व स्पर्धा क्रीडा संकुल सोलापूर येथे पार पडल्या.
या अनुषंगाने न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये या सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक प्रा हिम्मतराव साळुंखे, प्रा सचिन हजारे, प्रा कामाजी नायकुडे, प्रा अरुण बेहेरे यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य प्रा केशव माने होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सचिव मा. विठ्ठलराव शिंदे सर होते. प्रारंभी सर्व यशस्वी खेळाडू व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक यांचा सत्कार प्रमुख पाहुणे मा. संस्था सचिव विठ्ठलराव शिंदे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याचबरोबर सूर्योदय परिवाराकडून देण्यात आलेल्या शिक्षक गौरव पुरस्कार प्रा सौ नीलिमा मिसाळ मॅडम व प्रा तानाजी गावडे यांना मिळाल्याबद्दल त्यांचाही प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
आपल्या मार्गदर्शनपर मनोगत मध्ये बोलताना संस्था सचिव विठ्ठलराव शिंदे सर यांनी आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्यामधील सर्वात आनंदाचा क्षण असल्याचे सांगितले. या शैक्षणिक संस्थेची स्थापना डॉ. गणपतराव देशमुख यांच्या प्रेरणेने झाली असल्याचे सांगितले, तेव्हापासून आजपर्यंत एकाच वेळी तीन संघांनी जिल्हास्तरीय सांघिक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला नव्हता. यावर्षी तीनही संघांनी जिल्हास्तरीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळवणे हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी सदगुणांची जोपासना केली तर यश निश्चित मिळते. जीवनाची जडण घडण होत असताना कोणते सदगुण स्वीकारावे याचा विचार सर्वांनी केला पाहिजे.
सूर्योदय परिवारा मार्फत दिला जाणारा शिक्षक गौरव पुरस्कार विद्यालयातील तीन शिक्षकांना दिल्याबद्दल सूर्योदय परिवाराचे आभार मानले. सर्व यशस्वी खेळाडू, मार्गदर्शक शिक्षक व सन्मान पात्र शिक्षक या सर्वांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
आपल्या मनोगतामध्ये बोलताना संस्था सदस्य प्रा. अशोकराव शिंदे यांनी क्रीडा क्षेत्रातील कामगिरी उल्लेखनीय असल्याचे सांगून मार्गदर्शक शिक्षकांचे, यशस्वी खेळाडूंचे व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले. याप्रसंगी खेळाडूंना किट दिल्याबद्दल प्रा सौ.इंदिरा येडगे मॅडम यांचाही मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षकांमधून सो मिसाळ मॅडम व श्री तानाजी गावडे सर व सौ इंदिरा इंडिया मॅडम यांनी आपली मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी संस्था सदस्य प्रा दिपक खटकाळे, प्रा जयंत जानकर,न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला चे प्राचार्य प्रा.केशव माने, उपप्राचार्य प्रा. संतोष जाधव, पर्यवेक्षक श्री तानाजी सूर्यगंध सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा मिलिंद पवार, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा संतोष राजगुरू यांनी तर आभार प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. देवेन लवटे यांनी मानले.