sangola

एस टी बस सुरू करुन दिपकआबांनी दिलेला शब्द केला पूर्ण..

HTML img Tag Simply Easy Learning    

गावभेट दौर्‍यात दीपकआबा साळुंखे पाटील यांच्याकडे डोंगरगावच्या महिलांनी मागणी केलेल्या सांगोला-जत एस टी बस सेवेचा शुभारंभ करुन दिपकआबांनी महत्वाची मागणी पुर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे.

डोंगरगावातील नागरिकांना जत तालुक्याला कामानिमित्त त्याबरोबरच रुग्णालयात जाण्यासाठी सोनंद पर्यंतचा प्रवास करून तिथून दुसरी गाडीचे माध्यमातून जत ला जायला खूप त्रास होत होता. ठीक त्याच वेळी डोंगरगावातील महिलांनी एकत्र येऊन सांगोला जत ही लालपरी डोंगरगाव मार्गे चालू करावी असे मुद्दे दोन-तीन वेळा पाठीमागे देखील मांडण्यात आले होते. या सर्व गोष्टीवरती पूर्वी काही ठिकाणी पत्र देऊन देखील गाडी सुरू करण्यात आली नव्हती. त्याबरोबरच 5 ऑगस्ट 2024 रोजी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गाव भेट दौर्‍यादरम्यान सौ.जयश्रीताई पवार आणि महिला वर्गांनी पुढाकार घेऊन त्या गावभेट दौर्‍यादरम्यान दीपकआबा साळुंखे पाटील यांच्यासमोर डोंगरगावातील दूध उत्पादक दरवाढ , महिलांना उद्योगांना प्रोत्साहन व सांगोला -जत मार्गावरील एसटी डोंगरगाव मार्गे सुरु करावी ही मागणी केली होती . तसेच जनतेच्या सह्यांचे पत्र दिपकआबांना दिले. तात्काल दखल घेऊन दिपकआबाच्या प्रयत्नातून या मार्गावर 19 सप्टेंबर 2024 रोजी पहिली लाल परी धावली. या निर्णयामुळे वासुद , अकोले, निजांमपूर, मानेगाव या गावतील वृध्द, महिला यांना ही खुप सोइस्कर झाले .ही लाल परी सांगोला येथून सकाळी सात वाजून 30 मिनिटांनी जत मार्गिकासाठी निघेल गाडी सांगोला, वासूद ,अकोला, निजामपूर, मानेगाव, डोंगरगाव ,वाळेखिंडी वाया शेगाव आशी जत ला जाईल.

सदर गाडी आज सुरू झाल्यामुळे प्रत्येक गावामध्ये गाडीच्या चालक आणि वाहक यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रमाणेच डोंगरगाव नगरीत देखील या गाडीचे चालक आणि वाहक यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी बसच्या स्वागत करण्यासाठी यशराजे साळुंखे- पाटील हे उपस्थित होते. सौ जयश्रीताई श्याम पवार,यांनी श्रीफळ वाढउन पूजा केली, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कडून यशराजे साळुंखे, तसेच चालक वाहक आणि प्रवास करणार्‍या महिला यांची फेटा, शहाल , श्रीफळ देऊन सन्मान करण्यात् आला. तानाजी बाबर यांनी प्रस्तावना मांडली.

यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सचिव श्री सुहास बाबर, माजी सरपंच सतीश वाघमारे, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक श्री तानाजी बाबर,सामाजिक कार्यकर्ते श्री श्याम सोपान पवार, विशालदीप बाबर , रामहरी किरगत , माणीक गुरव , साहेबराव कदम, अशोक बाबर सर, आबासो बाबर , सुभाष किरगत , बाजीराव बाबर, जगन्नाथ कदम, संकेत शाम पवार , रामचंद्र राजगेे , अब्दुल मुलाणी, रशीद मुलाणी , अलकाताई शेंडे , तसेच यशराजे साळुंखे पाटील त्याचबरोबर इतर कार्यकर्ते आणि सर्व युवक आणि सर्व पक्षाचे कार्यकर्ते सोबतच गावातील इतर ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी गावकरी मंडळींकडून दिपकआबा साळुंखे पाटील यांनी कामाचे पूर्तता केल्याबद्दल अभार मानले. त्याचबरोबर या कामाची मागणी करणार्‍या सर्वांचे आभार मानले.
[8:15 pm, 19/9/2024] Amey Maske: हे

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!