फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस मध्ये राष्ट्रीय अभियंता दिन उत्साहात संपन्न

सांगोला : अभियंत्यांचे प्रेरणास्थान असलेल्या भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जयंती दिन देशभरात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे व डीन अँकँडमीक डॉ. शरद पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सर विश्वेश्वरैया यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
‘फादर ऑफ इंजिनिअरिंग’ म्हणून ज्यांना ओळखले जाते, अशा भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशात अभियंता दिन साजरा केला जातो. स्वातंत्र्योत्तर काळात देशातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये डॉ. विश्वेश्वरैय्या यांनी मोलाचे योगदान होते.असे डीन अँकँडमीक डॉ. शरद पवार यांनी सांगितले.विद्यार्थ्यांना डॉ. विश्वेश्वरैय्या यांचे कार्य समजावे तसेच अभियंता म्हणून सामाजिक जबाबदारीची जाणीव व्हावी, यासाठी फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये दरवर्षी अभियंता दिन साजरा करण्यात येतो. डॉ. विश्वेश्वरैय्या यांच्या निमित्त महाविद्यालयामध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याबरोबरच सर्व विभागातील गुणवंत विद्यार्थ्याचे सत्कार करण्यात आले .
हा कार्यक्रम फॅबटेक चे चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री.दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे, व्यवस्थापक प्रतिनिधी प्राजक्ता रुपनर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे, डीन अँकँडमीक व ए.आय.डी.एस इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. शरद पवार , आय.क़्यु ए सी. चे डॉ.वागीशा माथाडा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा.राहुल अवताडे , कॉम्पुटर सायन्स इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ.तानाजी धायगुडे ,सिव्हील इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा.शिवानंद माळी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा.संदीप कदम, ई.एन अॅड टी.सी इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा.धनश्री राउत व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थितीत होते.
कार्यक्रमाचे आयोजन प्रा.प्रियांका पावसकर,प्रा.शरद आदलिंगे,प्रा.चैत्राली धुमाळ, प्रा.विनायक साळे, प्रा.गजानन काळे, प्रा.अतिश जाधव, प्रा.पल्लवी बिले, प्रा.दुर्गा पाटील यांनी केले.