sangola

कै. आण्णासाहेब चांदणे कृषि तंत्र निकेतनमध्ये ’आचार्य चाणक्य कौशल्य विकास’ केंद्राचे उद्घाटन

HTML img Tag Simply Easy Learning    

सांगोला(प्रतिनिधी):-मौजे एखतपूर येथे दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी कौशल्य विकास मंत्रालय, महाराष्ट्र शासन अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या ’आचार्य चाणक्य कौशल्य विकास’ केंद्राचा उद्घाटन समारंभ पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते पार पडला. हा सोहळा दूरदृष्टि प्रणालीद्वारे वर्धा येथून प्रक्षेपित करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन कै. आण्णासाहेब चांदणे कृषि तंत्र निकेतन, एखतपूर विद्यालयामार्फत करण्यात आले होते.

सोलापूर जिल्ह्यात एकूण 26 कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन या दिवशी करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान बोलताना संस्थेचे अध्यक्ष श्री प्रभाकर चांदणे यांनी विद्यार्थ्यांना नव-नवीन कौशल्ये आंगीकारण्या बद्दलचे महत्व पटवून दिले. कै. आण्णासाहेब चांदणे कृषि तंत्र निकेतनमध्ये नव्याने सुरु होत असलेल्या ’आचार्य चाणक्य कौशल्य विकास’ केंद्रांतर्गत ’डेअरी टेक्नॉलॉजी’, शेळीपाळन व यासारखे इतर कृषि विषयी कौशल्य शिक्षण देण्यात येणार आहे.सदर समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार श्री. संतोष कणसे, तालुका कृषि अधिकारी श्री. शिवाजी शिंदे उपस्थित होते.

याप्रसंगी तालुका कृषि अधिकरी शिवाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य विकासावर भर द्यावा, डेअरी टेक्नॉलॉजीने दूध उत्पादन वाढ होणार असल्याचे सांगितले. तसेच तहसीलदार संतोष कणसे यांनी एखतपुर आणि परिसरातील विद्यार्थ्यानी या कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. आपला व आपल्या कुटुंबाचा विकास करून घ्यावा असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी औद्यगिक प्रशिक्षण संस्था, सांगोलाचे गटनिदेशक श्री.शिकलगार, आध्यापक विद्यालय, एखतपूरचे प्राचार्य श्री. आलिगावे सर तसेच शिक्षक व विद्यार्थी, विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. माने सर तसेच शिक्षक व विद्यार्थी, कै. आण्णासाहेब चांदणे कृषि तंत्र निकेतन, एखतपूरचे प्राचार्य कौलगे सर तसेच शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.प्रास्ताविक नोडल अधिकारी श्री बंडगर यांनी, सूत्रसंचालन श्री कोळी सर यांनी तर आभार श्री कौलगे सर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत एखतपुरचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!