महाराष्ट्र

भाळवणी गटात दिपक आबांचा झंझावात ५ वर्षे जनतेचा सालगडी म्हणून काम करण्याचं अभिवचन

तळागाळातील आणि सामान्य लोकांपर्यंत आम्ही रोज पोहोचत आहोत. त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न आम्ही ऐकून घेत आहोत. लोकांना विकास हवा आहे. फक्त आश्वासन नको तर ज्या काही त्यांच्या मोजक्या समस्या आहेत त्या सोडवण्यात याव्यात असं लोकांकडून सांगण्यात येत आहे.

मतदारसंघातील ज्या काही जनसामान्यांच्या समस्या आहेत. त्या सोडवण्याचा पुरेपूर मी प्रयत्न करीत आहे. जनतेची सेवा करण्याची एकवेळ संधी द्यावी, पुढील पाच वर्षे जनतेचा सालगडी म्हणून काम करण्याचं अभिवचन देत सर्वसामान्य लोकांच्या, तळागाळातील लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या प्राधान्यानं सोडवणार असल्याचा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिला.

महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी गटातील जैनवाडी, शेंडगेवाडी, केसकरवाडी गावात प्रचार सभा संपन्न झाली.

पुढे बोलताना दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले की, सांगोला विधानसभा मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकासाचा कायापालट करण्यासाठी डोळ्यासमोर व्हिजन ठेवले आहे. शेतीला नीरा उजवा कालव्याचे पाणी कायमस्वरुपी मिळण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. शहाजीबापूंनी निवडणुक पैशात मोजायला सुरुवात केली तर तीन वर्षापूर्वी आलेले बाबासाहेब देशमुख वारसदार म्हणून मते मागत आहेत. एकवेळ मला विधानसभेत पाठवा, मतदरसंघाचा एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही. बेरोजगारी कमी करण्यासाठी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मतदारसंघात पाच एमआयडीसी आणून ५० हजार कोटी रुपयांचा निधी आणणार आहे. दुधाला ५ रुपयांचे अनुदान देण्याची मागणी राज्यात पहिल्यांदा मी केली होती. निवडून आल्यावर प्रत्येक गावात दर महिन्याला जनता दरबार आयोजित करून जनतेच्या प्रश्नांचा जागीच निपटारा करण्यास प्राधान्य देणार असल्याचे दिपकआबा साळुंखे पाटील यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते पी.सी.झपके, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, जेष्ठ नेते साईनाथ अभंगराव, नागनाथ खरात, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे, आर. डी.पवार, अवि देशमुख, मोहसीन तांबोळी, अक्षय केसकर, लक्ष्मण सुरवसे, हणमंतराव पवार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक उपस्थित होते.

 

————–

 

जातीपातीचे राजकारण विसरून विकासाला प्राधान्य द्यावे – अभिषेक कांबळे

 

शेकापचे सध्याचे नेतृत्व स्व. गणपतराव देशमुख यांच्या पुरोगामी विचारला फाटा देण्याचा प्रयत्न करीत आहे. विरोधक विकासावर बोलण्यापेक्षा मतदारांना अमिष दाखवत आहेत. विरोधक जातीचे, पैशाचे राजकारण करीत आहेत. दिपकआबांनी ३५ वर्षे जनतेची सेवा केली तर शहाजीबापूंनी ५ वर्षात फक्त खोक्याचं राजकारण केलं. शेकापचे माजी आमदार स्व.गणपतराव देशमुख यांना डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी कधीही मतदान केलं नाही, त्यामुळे डॉ.बाबासाहेब देशमुख यांना मते मागण्याचा अधिकार नाही. त्यामुळे मतदारांनी जातीपातीचे राजकारण विसरून विकासाला प्राधान्य द्यावे. गोरगरीब दीन, दलित, उपेक्षित, वंचित समाजाच्या क्रांतीची मशाल हाती घ्यावी अन् दिपकआबांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे यांनी केले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button