सांगोल्यातील घटना; जनावराच्या व्यापाऱ्यावर दोघांचा कोयत्याने हल्ला; खिशातील दोन लाख रुपये काढून नेले
सांगोला (प्रतिनिधी) सांगोला येथील बाजारामध्ये विक्रीस आणलेल्या म्हशीस आठवडा बाजारातील रोडवरून घेवुन जात असताना दोघांनी तु आमच्या म्हशीच्या पाठीमागुन तुझी म्हैस ओढत का नेत आहे,असे म्हणुन शिवीगाळी करून त्याचे हातातील लोखंडी कोयत्याने कपाळावर मारून पँन्टीच्या खिश्यातील दोन लाख पाच हजार रूपये काढून घेतले व परत आमचे नादी लागला तर तुला सोडणार नाही अशी धमकी देवुन निघुन गेले असल्याची घटना रविवार दि.२२सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सांगोला येथील आठवडा बाजारात घडली आहे.
फिर्यादी आलम उस्मान पठाण वय २८ रा. राजवडी ता.इंदापुर जि. पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते सोलापुर जिल्ह्यामध्ये तसेच इतर ठीकाणी जनावरांचे अठवडा बाजारात जावुन जनावरे खरेदी विक्रीचा व्यावसाय करतात ते रविवार दि.२२ रोजी सांगोला येथील आठवडा बाजारात आले असता त्यांच्या ओळखीचे सोन्या भोसले व दिपक भोसले दोघेही रा.बावडा ता. इंदापुर हेही जनावरांचे खरीदी विक्रीचे व्यापाराकरीता सांगोला येथे येत असतात दरम्यान सकाळी साडेदहा वा. चे सुमारास फिर्यादी पठाण हे बाजारात विक्रीस आणलेल्या म्हशीस बाजारातील रोडवरून घेवुन जात असताना सोन्या भोसले व दिपक भोसले हे फिर्यादी पठाण यांचे जवळ आले व तु आमच्या म्हशीच्या पाठीमागुन तुझी म्हैस ओढत का नेत आहेस,असे म्हणुन शिवीगाळी करू लागले त्यावेळी फिर्यादीने त्यांना माझी म्हैस बाजुला घेतो असे म्हणाले असता सोन्या भोसले याने “तु तुझी म्हैंस आमच्या म्हशीचे पाठीमागे आणलीच का असे म्हणुन त्याचे हातातील लोखंडी कोयत्याने फिर्यादी पठाण याचे कपाळावर मारला व दिपक भोसले याने हाताने, लाथाबुक्याने मारहाण केलीं तसेच सोन्या भोसले याने पँन्टीच्या खिश्यातील दोन लाख पाच डजार रूपये काढून घेतले व परत आमचे नादी लागला तर तुला सोडणार नाही अशी धमकी देवुन निघुन गेले आहेत.याबाबत आलम पठाण यांनी सोन्या भोसले व दिपक भोसले दोघे रा बावडा ता. इंदापुर यांचे विरूद्ध फिर्याद दाखल केली आहे.
तसेच दुसऱ्या घटनेत सुनिल बबन चव्हाण रा.झरे ता.आटपाडी जि.सांगली हे सकाळी साडेअकरा वा.चे सुमारास सांगोला येथील आठवडा बाजारात आले असता त्यांनी निखिल गडहिरे यास बाजारातील जर्सी गायीची किंमत विचारली असता निखील गडहिरे याने तु किंमत विचारली आहे तर ही गाय का विकत घेत नाहीं , तु चौकशी का केली असे म्हणुन सुनिल चव्हाण यांना धक्काबुक्की व शिवीगाळी दमदाटी करून यांचे खीशातील १५ हजार रूपये काढून नेले आहेत याबाबत सुनील चव्हाण यांनी निखिल गडहिरे यांच्या विरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल केली आहे या घडलेल्या दोन घटनेमुळे शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सांगोला येथील आठवडा बाजार शेळ्या, मेंढ्या तसेच जनावरांचा बाजार म्हणून प्रसिद्ध आहे. आठवडा बाजारात बाहेरगावाहून आलेल्या व्यापारी, शेतकऱ्यांना काहीजण जाणून बुजून त्रास देत असल्याच्या तक्रारी आहेत खरेदी विक्रीस आलेल्या व्यापारी व शेतकऱ्यांशी हुज्जत घालून आरेगावी व धक्काबुक्की केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत आज झालेल्या दोन घटना मुळे आठवडा बाजारात चालले काय ? मार्केट कमिटी याबाबत का मूग गिळून गप्प का आहे ? असा प्रश्न शेतकरी व व्यापाऱ्यांना पडला आहे.



