कोळे येथील करांडे नरळे वस्ती जिल्हा परिषद शाळेत जागतिक कन्या दिनानिमित्त मुलींचा सन्मान सोहळा संपन्न..

सांगोला तालुक्यातील कोळे येथील श्री गुरुदत्त महाराज मोफत वाचनालय कोळे यांच्या सहकार्याने शाळेमध्ये मुला मुलींमध्ये एकमेकाचा आदर व्हावा लाडक्या बहिण भावाचे नाते घट्ट होऊन आपुलकी निर्माण व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उपस्थित मुला मुलींनी शाळेमध्ये एकमेकांना चॉकलेट वाटून आनंद साजरा केला यावेळी वाचन उपक्रम कार्यक्रम घेण्यात आला या आनंदमय सोहळ्यास मुख्याध्यापक जालिंदर नरळे सहशिक्षक प्रवीण आदलिंग सचिन भांगरे सहभागी झाले होते. उपस्थित आमचे आभार स्वागत सौ सारिका आदलिंग मॅडम मानले. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना वाचनालय या वतीने चॉकलेट वाटण्यात आले.



