अजनाळे: निवृत्त मंडल अधिकारी मोतीराम धोंडीबा धांडोरे यांचे काल बुधवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले आहे. निधनासमयी त्यांचे वय ६८ वर्ष इतके होते. त्यांच्या पाश्चात पत्नी,३ मुले १ मुलगी असा मोठा परिवार आहे.
लेखक, कवी, दिग्दर्शक पत्रकार देवदत्त धांडोरे यांचे ते वडील होते तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अजनाळे येथील सहशिक्षिका ज्योती मोरे यांचे ते सासरे होते. त्यांचा स्वभाव शांत व मनमिळाऊ असा होता त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सकाळी ७:३० वाजता अजनाळे येथील स्मशानभूमीत होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.