राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूरचा 20 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा

सांगोला :-राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर चा 20 वा स्थापना दिवस डॉ. परमेश्वर शिरगुरे, प्रभारी संचालक यांच्या अध्यक्षतेखाली साजरा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. तांबडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र उपस्थित होते, तर डॉ. नितिनकुमार रनशूर, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय कृषी संशोधन केंद्र सोलापूर आणि डॉ. बसवराज रायगोंड, वरिष्ठ शास्त्रज्ञ, IIMR, सोलापूर सन्माननीय पाहुणे होते.
कार्यक्रमाची सुरुवात अतिथींच्या स्वागत व सत्काराने झाली. डॉ. दिनेश बाबू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर च्या महत्त्वाच्या कामगिरीचे सादरीकरण केले. डॉ. बसवराज रायगोंड यांनी आपल्या भाषणात ICAR-NRCP च्या कामाचे कौतुक केले.
कार्यक्रमात शेतकऱ्यांचा आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कर्नाटक येथील श्री. नटेश एसी आणि नाशिक येथील श्री. रामहरी सुरसे यांना प्रगत शेतकरी पुरस्कार देण्यात आले. स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत संस्थेतील सफाई कामगारांना सफाईमित्र सन्मान पुरस्कार देण्यात आले. यासोबतच अनुसूचित जाती उपयोजना (SCSP) अंतर्गत अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना ब्रश कटर वाटप करण्यात आले.स्थापनदिनाचे औचित्य साधून डाळिंब उत्पादनातील तांत्रिक शोधांची पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. श्री. आर बी राय यांनी हिंदी भाषेचे महत्व विशद केले कार्यक्रमामध्ये पत्रकार मित्र श्री. विजयकुमार देशपांडे, श्री. विक्रम खेलबुडे, आणि श्री. सुदर्शन सुतार, यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे श्री. तांबडे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर च्चा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासातील भूमिकेवर प्रकाश टाकला. डॉ. शिरगुरे यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या माजी संचालक आणि डॉ. राजीव मराठे यांच्या योगदानाचा उल्लेख केला.
कार्यक्रमाची सुरुवात ICAR गीताने आणि समाप्ती राष्ट्रगीताने झाली. डॉ. दिनेश बाबू आणि डॉ. संग्राम धुमाळ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले, तर आभार प्रदर्शन डॉ. रंजन सिंग यांनी केले.