धनगर समाज सेवा महिला मंडळ सांगोला या मंडळाच्या अध्यक्षपदी सौ .ज्योती चोरमुले, उपाध्यक्षपदी सौ. कल्पना माने ,सचिव पदी सौ. सुनीता मेटकरी, खजिनदार पदी सौ. छायाताई मेटकरी, सल्लागारपदी ॲड सौ .संजीवनी लवटे यांची निवड

सांगोला येथील धनगर समाजसेवा महिला मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी 15 ऑगस्ट 2023 रोजी धनगर समाज मंदिर अहिल्यानगर सांगोला या ठिकाणी दुपारी २ वाजता माजी. नगराध्यक्षा सौ . राणीताई माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाल्या.
या मंडळाच्या अध्यक्षपदी सौ.ज्योती चोरमुले ,उपाध्यक्षपदी सौ. कल्पना माने ,सचिवपदी सौ.सुनीता मेटकरी, खजिनदारपदी मा.नगरसेविका सौ. छायाताई मेटकरी, सल्लागारपदी ॲड.सौ. संजीवनी लवटे यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली आहे.
धनगर समाज सेवा महिला मंडळाची स्थापना 15 ऑगस्ट 2019 रोजी करण्यात आली आहे. या महिला मंडळाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येणार असून त्याद्वारे समाजातील महिलांना एकत्रित करणे व त्यांना विविध प्रकारचे मार्गदर्शन व प्रबोधन करून समाजाची प्रगती साधली जाणार आहे. समाजातील महिलांना एकत्रित करून त्यांना व्यासपीठ मिळवून देण्यात येणार आहे. यावेळी धनगर समाज सेवा महिला मंडळाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना भावी सामाजिक कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.