रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने आदर्श प्राथमिक विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी CCTV कॅमेरे बसवण्यात आले व ग्रीन बोर्ड प्रदान करण्यात आला. सर्व शाळांमध्ये नवीन शालेय नियमानुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे क्रमप्राप्त झाले आहे. या अनुषंगाने शाळेची गरज लक्षात घेता प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी सीसीटीव्ही बसवण्यात आले. या अंतर्गत 2 कॅमेरे, DVR व स्क्रीन बसवण्यात आला. तसेच सर्व काम पूर्ण झाल्यानंतर कॅमेऱ्याचे कार्य तपासण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात क्रांती महर्षी सावित्री बाई फुले यांच्या फोटोचे पूजन रो. इंजि.हमिद शेख यांच्या हस्ते करून करण्यात आली.या कार्यक्रमाप्रसंगी रो. इंजि. विकास देशपांडे यांनी प्रास्ताविक केले व शाळेमध्ये कॅमेरे बसवण्याचे फायदे सांगितले.रो.डॉ. प्रभाकर माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमात शाळेसाठी ग्रीन बोर्ड ची आवश्यकता होती म्हणून याप्रसंगी रो.माणिक भोसले ,रो. श्रीपती आदलिंगे,रो. अरविंद डोंबे,रो.इंजि.अशोक गोडसे,रो.इंजि.मधुकर कांबळे यांच्या हस्ते शाळेसाठी ग्रीन बोर्ड फळा प्रदान करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक यांनी शाळेस बहुमोल मदत केल्याबद्दल रोटरी क्लबचे आभार मानले व धन्यवाद व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री गवळी सर व शिक्षक वर्ग विशाल व्होवाल,शीतल माळी,जयश्री वाघमोडे,मयुरी नवले यांचे विशेष सहकार्य लाभले . कार्यक्रमास सर्व विद्यार्थी उपस्थित होता.