शेकापचे डॉ.बाबासाहेब देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख यांच्यासह 20 ते 25 इसमांवर गुन्हा दाखल

आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, एक धनगर कोटी धनगर अशा घोषणा देवून रोडवरुन जाणारे वाहनांना मज्जाव करुन बेकायदा जमाव जमवुन जमावबंदी आदेशाचा तसेच धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करणेस निर्बध असताना जिल्हाअधिकारी  सोलापुर यांचे आदेशाचा भंग केला म्हणून शेकापचे डॉ.बाबासाहेब देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख यांच्यासह इतर 20 ते 25 इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्याद नागनाथ वाकीटोळ (पोना.सांगोला पोलीस ठाणे) यांनी दिली आहे.

याबाबत सांगोला पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,  दि.23 सप्टेंबर 2024 रोजी सांगोला पंचायत समिती समोर सांगोला-पंढरपूर रस्त्यावर धनगर समाजातील लोकांनी रास्तारोको केले आहे. अशी माहिती मिळाल्याने फिर्यादी पोलिस नाईक वाकीटोळ, श्रीकांत जाधव,चव्हाण, पवार, व्हरे, दरदरे यांनी सदर ठिकाणी जावुन पाहिले. पंचायत समिती समोरील रस्त्यावर धनगर समाजातील लोकांनी त्यांना लवकरात लवकर एस. टी. प्रवर्गातून आरक्षण मिळावे व पंढरपूर येथे उपोषणास बसलेले धनगर समाजातील समाज बांधवांना पाठींबा म्हणून सांगोला ते पंढरपूर जाणारे हायवे रोडवर बसून आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे, एक धनगर कोटी धनगर अशा घोषणा देवून रस्त्यावर दुपारी 11:30 ते 12:15 वा. चे सुमारास रास्तारोको करून सांगोला ते पंढरपूर रोडवरुन जाणारे येणारे वाहनांना मज्जाव करून रास्तारोको आंदोलन केले. या रास्तारोको आंदोलनात दिलीप जानकर, नवनाथ शिंगाडे, परमेश्वर जानकर, डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख, विष्णू देशमुख, बिरुदेव शिंगाडे, शंकर मेटकरी,  बालाजी येडगे,  यांच्यासह इतर 20 ते 25 इसम सदर सहभागी होते. म्हणुन माझी वरील इसमांविरुध्द सरकारतर्फे बी.एन.एस 2023. कलम 126(2),189 (2),190,223 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे फिर्याद असल्याचे फिर्याद नमूद करण्यात आले आहे.

———————-

घेरडी आंदोलन-
घेरडी येथे श्रीनिवास मधुकर करे,  रामचंद्र घुटूकडे, रघु घुटुकडे, बिरा मारूती निमगेर,  दादासो करे, बयाजी लवटे,  दिलीप मोटे, अनिल मोटे, हरीभाऊ पुकले,  यशंवत पुकले, गोविंद  कोळेकर, रामचंद्र घुटूकडे,  सुरेश देवकते,  राजाराम घुटूकडे रा. घेरडी यांच्यासह इतर 20 ते 25 इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद पोना.अंकुश नलवडे यांनी दिली आहे.

———————-
अनकढाळ आंदोलन-
सांगोला ते मिरज रोडवर अनकढाळ येथे उल्हास धायगुडे, आनंदकुमार मेटकरी, तुकाराम माने, राजु लवटे, उमाजी खरात, समाधान बंडगर यांच्यासह इतर 20 ते 25 इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद धुळदेव चोरमुले यांनी दिली आहे.

———————-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button