यलमार समाजाच्या वतीने उद्या आ.शहाजीबापूंचा भव्य सत्कार समारंभ

सांगोला शहरात यलमार समाजासाठी सामाजिक सभागृह बांधण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल सांगोला विधानसभा मतदारसंघातील यलमार समाजाच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मारुती मंदिरासमोर यलमार मंगेवाडी या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

आमदार शहाजीबापू पाटील यांनी सर्वच समाजासाठी सभागृह, समाजमंदिर बांधण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांनी यलमार समाजासाठी सांगोला शहरातील नगरपालिका जागेत सामाजिक सभागृह बांधण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निमित्ताने यलमार समाजाच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मारुती मंदिरासमोर यलमार मंगेवाडी या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी युवासेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सागर पाटील, विधानसभा प्रमुख प्रा.संजय देशमुख, विधानसभा समन्वयक सुभाष इंगोले, तालुका संघटक युवराज पाटील, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख राणी माने, ओबीसी आघाडीचे जिल्हाप्रमुख शिवाजी घेरडे, शिवसेना नेते दिग्विजय पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, युवासेना तालुकाप्रमुख दीपक उर्फ गुंडादादा खटकाळे, नूतन तालुका संपर्क प्रमुख अभिजीत नलवडे मागासवर्गीय आघाडीचे तालुकाप्रमुख दीपक ऐवळे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाप्रमुख प्रितेश दिघे, विद्यार्थी संघटनेचे तालुकाप्रमुख अजिंक्य शिंदे, शिवसेना शहर संघटक आनंदा माने, शहरप्रमुख ज्ञानेश्वर तेली, शिवसेना शहर उपप्रमुख सोमेश यावलकर, युवासेना शहरप्रमुख समीर पाटील, महिला आघाडीच्या शहर प्रमुख छाया मेटकरी, महिला शहर समन्वयक शोभा घोंगडे, शिवसेना ओबीसी सेलच्या शहर प्रमुख आयुब मुलाणी, शिवसेना एससी सेल शहर प्रमुख कीर्तीपाल बनसोडे आदी उपस्थित राहणार आहेत.

 

,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button