सांगोला विधानसभा मतदारसंघातील ३८ ट्रान्सफॉर्मरसाठी अडीच कोटींचा निधी मंजूर- आमदार शहाजीबापू पाटील

सांगोला (तालुका प्रतिनिधी): सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतीपंपाला पुरेशा दाबाने वीज पुरवठा व्हावा म्हणून आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलेल्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीमधून ३८ नवीन व अतिरिक्त ट्रान्सफार्मरसाठी २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. वीजेसाठी निधी मंजूर झाल्यामुळे शेतीसाठी वीजेची कटकट कमी होवून शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने वीजपुरवठा होणार आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांनी राज्यस्तरावर केलेल्या प्रयत्नातून विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी मोठया प्रमाणात निधी मंजूर झाला असतानाच आता शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने वीज पुरवठा व्हावा म्हणून ३८ ट्रान्सफॉर्मरसाठी अडीच कोटींचा निधी मंजूर केला आहे.
सामान्य विकास व पद्धती सुधारण्यासाठी महाराष्ट्र वीज वितरण मंडळ या अनुदानातून २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समिती कडून सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी आमदार शहाजी बापू पाटील यांना मिळाला आहे. या निधीतून आमदार शहाजीबापू पाटील यांनी खालील ३८ नवीन ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे सुचविलेले आहे. चिकमहुद मुळेवस्ती डीपी येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे, टिंगरे वस्ती येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे, जुनोनी ढोले वस्ती येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे, कडलास येथे महेश लेंडवे यांच्या शेतात ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे, किडेबिसरी कल्याण नगर येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे, तिप्पेहळ्ळी चोपदार वस्ती येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे, महुद बु. प्रभाकर नामदेव मेटकरी शेत गोडसे डीपी येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे, जुजारपूर कड्याचा मळा बाबासाहेब वस्ती येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे, वासुद प्रज्ञा चंदनशिवे यांचे शेतात ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे, नरळेवाडी (वाकी) पाणी पुरवठा विहीरीजवळ पाणी पुरवठ्यासाठी पाणी पुरवठा स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसविणे, खारवटवाडी स्टॉप येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे, पाचेगाव खु गायकवाड वस्ती डीपी येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे, शिवणे खरातवाडी येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे, सोनके ता.पंढरपूर महारनवर वस्ती येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे, खवासपूर नामदेव सर्जेराव भोसले गट नं. ८७४ येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे, लक्ष्मीनगर सोमनाथ नरळे, नरळे वस्ती येथे २५ के.व्ही. नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे, नाझरा, बनसोडेवाडी शाळा डीपी येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे, सांगोला देशमुख वस्ती डीपी येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे, बलवडी शिंदे शेख वस्ती येथे अर्जुन शिंदे यांच्या शेतात ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे, महुद बु. बापुसाहेब पवार वस्ती येथे नविन भगीरथ ट्रान्सफॉर्मर बसविणे, आलेगाव वाघमोडे वाडी येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे, अकोला खटकाळे मळा नं.१ वर ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे, कटफळ ठेंगील वस्ती केवढा येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे, खिलारवाडी खांडेकर वस्ती येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे, वाकी गवळी डीपी वर ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे, हलदहिवडी खजीने डिपी येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे, सांगोला मिरज रोड सह्याद्री डीपी येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे, गार्डी ता.पंढरपूर गट नं.३७४/२ शर्व ॲग्रोटेक येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे, घेरडी डवरी डीपी येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे, वाकी घेरडी तानाजी लवटे डीपी येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे, भंडीशेगाव ता. पंढरपूर विलास ज्ञानोबा यलमार डीपी येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे, भाळवणी ता. पंढरपूर खंडोबा मंदीर डीपी येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे, केसकरवाडी ता. पंढरपूर निकम डीपी रावसाहेब महादेव निकम यांच्या शेतात ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे, खेडभाळवणी ता. पंढरपूर रेणुका नगर येथे नवीन भगीरथ ट्रान्सफॉर्मर बसविणे, शेळवे ता. पंढरपूर दत्त नगर येथे नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे, उपरी ता. पंढरपूर रामोशी वस्ती येथे ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविणे, पळशी ता. पंढरपूर मधुकर कुंडलीक महारनवर पळशी फाटा थ्री फेज ट्रान्सफॉर्मर बसविणे, सांगोला अनिरुद्ध पुजारी मळा येथे नवीन भगीरथ ट्रान्सफॉर्मर बसविणे.
ट्रान्स फार्मरच्या निधीचे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करू नये -आमदार शहाजीबापू पाटील
सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना अखंडीत वीजपुरवठा करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे ३८ ट्रान्सफार्मर साठी निधी देण्याची मागणी केली होती. यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून आमदारांच्या कोट्यातून अडीच कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या ट्रान्सफार्मरच्या निधीचे श्रेय चोरण्याचा कोणत्याही नेत्याने प्रयत्न करून जनतेची दिशाभूल करू नये असा सल्ला आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिला आहे.