सांगोला (प्रतिनिधि) : येथील सांगोला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सांगोला येथील डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालायातील राष्ट्रीय सेवा योजने चे कार्यक्रम अधिकारी डॉ काकासाहेब घाडगे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. आपल्या मनोगता मध्ये प्रमुख पाहुणे म्हणाले की २४ सप्टेंबर १९६९ रोजी महात्मा गांधी यांच्या जन्म शताब्दी निमित्त देशात राष्ट्रीय सेवा योजना सुरु करण्यात आली . त्यामुळे प्रत्येक वर्षी २४ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय सेवा योजना दिवस म्हणून देशभर साजरा करण्यात येतो.राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपणास समाजाची सेवा करण्याची संधी मिळते . स्वच्छता अभियान , प्रौढ शिक्षण , व्यसन मुक्ती , लेक वाचवा, वृक्षारोपण, रक्तदान अश्या अनेक उपक्रमाच्या माध्यमातून आपणास सामाजाशी एकरूप होता येते . विद्यार्थ्यांना देशसेवा,समाजसेवा, अंधश्रद्धा निर्मुलन, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापना चे धडे या योजनेच्या मध्यमातून मिळतात . आपण ज्या सामाजामध्ये राहतो त्या समाजा विषयी आपुलकीची भावना वाढीस लावून समाजाचे वेगवेगळे प्रश्न समजून घेयून ते आपल्या परीने सोडवण्याचे बळ आपणास राष्ट्रीय सेवा योजना देते .थोडक्यात राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासचे करण्याचे काम करते असे प्रतिपादन त्यांनी या प्रसंगी केले .
तसेच त्यांनी ‘स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता’ या विषयावर मार्गदर्शन करताना महात्मा गांधीना अभिप्रेत असणारा देश घडवायचा असल्यास आपण सर्वांनी स्वच्छतेचे काळजी घेतली पाहिजे असे ही ते म्हणाले . महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगता मध्ये राष्ट्रीय सेवा योजने मध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्याचे अभिनंदन करून राष्ट्रीय सेवा योजने कडून आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमात सर्वांनी भाग घ्यावा असे आवाहन केले, तसेच स्वच्छते विषयी शपथ घेण्यात आली .या प्रसंगी आय.क्यू.ए. सी. चे समन्वयक डॉ राम पवार, डॉ बबन गायकवाड, डॉ .प्रकाश पाटील , प्रा. सोनल भुंजे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. नवनाथ शिंदे यांनी तर आभार डॉ. रमेश टेंभूर्णे यांनी मानले .