जागतिक वारसा नामांकनासाठी सांगोला महाविद्यालाचा सहभाग

भारतात सध्या 42 जागतिक वारसा स्थळे आहेत त्यापैकी 34 सांस्कृतिक स्थळे आहेत, सात नैसर्गिक स्थळे आहेत आणि एक मिश्रित स्थळे आहेत. महाराष्ट्रात गड किल्ल्यांचे विलक्षण जाळे आहे ते विविध भौगोलिक आणि भौतिक क्षेत्रांमध्ये वितरीत केले गेले आहेत. महाराष्ट्रात 390 हून अधिक किल्ले आहेत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट होण्यासाठी “मराठा मिलिटरी लँडस्केप्स”, मराठ्यांच्या राजवटीच्या सामरिक लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करणाऱ्या १२ किल्ल्यांचे 2024-25 च्या यादीत समावेश होण्यासाठी भारताने नामांकन केले आहे. त्यासाठी “मराठा मिलिटरी लँडस्केप” अंतर्गत महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, शिवनेरी, लोहगड, पन्हाळा, विजयदुर्ग, खांदेरी, सिंधुदुर्ग , आणि साल्हेर हे किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश केला आहे . या जागतिक वारसा नामांकानाचे साक्षीदार होण्याकरिता महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या पुणे विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.विलास वाहणे यांनी केलेल्या आव्हानानुसार सांगोला महावियालायाच्या इतिहास विभागाकडून महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या रविवार दिनांक २२ सप्टेंबर २०२४ रोजी किल्ले प्रतापगड येथे ‘महावारसा स्वच्छता मोहीममध्ये’ सहभाग घेण्याचा व ऐतिहासिक स्थळास अभ्यास भेट या उपक्रमात सहभाग घेतला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
गड किल्ले महाराष्ट्राचा अभिमान आणि अस्मितेचे प्रतिक आहेत आणि ह्यांचे जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश व्हावा यासाठी स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थीनी ,प्राध्यापक ,शिक्षेकेत्तर कर्मचारी यांचा सहभाग महत्वपूर्ण होता..सांगोला महावियालायाच्या इतिहास विभाग व वाणिज्य विभागातून महावारसा स्वच्छता मोहीममध्ये’ भाग १,२,३, चे ४२ विद्यार्थी तसेच विभागप्रमुख डॉ.सदाशिव देवकर, डॉ. महेश घाडगे ,व वाणिज्य विभागप्रमुख डॉ.विद्या जाधव, प्रा.प्राप्ती लामगुंडे यांनी सहभाग घेतला.या स्वच्छता मोहीममध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थीनी प्रतापगडावरील भवानी मंदिर,तटबंदी,बुरुज,साठवण तलाव,विहीर,प्रवेशद्वार इ.ठिकाणाची स्वच्छता केली.तसेच किल्ल्याचे महत्व,किल्याचे प्रकार,किल्ल्याचा इतिहासाची माहिती विद्यार्थीयांना देण्यात आली.