छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ शिवशिल्पला मुस्लिम समाजाकडून पुष्पहार अर्पण व सरबत वाटप संपन्न.

हिंदुस्थानचे आराध्य दैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवशिल्पचे सांगोला शहरात जल्लोषात आगमन झाले या आगमन सोहळ्यामध्ये शिवप्रेमी मुस्लिम समाज बांधवांकडून आपल्या राजाला मानाचा मुजरा करत कडलास नाका येथे पुष्पहार अर्पण करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मुस्लिम बांधवांकडून तमाम शिवप्रेमींना शुभेच्छा देत सरबत वाटप करण्यात आले
यावेळी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे, डॉ. बाबासाहेब देशमुख, नूर मणेरी, निहाल तांबोळी, कमरुद्दीन खतीब, फिरोज खतीब, शौकत खतीब, आयाज मणेरी, हिरालाल तांबोली,हाजी.बशीरभाई तांबोळी, पत्रकार मिनाज खतीब, गौस मुलाणी,मकसूद तांबोळी, शगीर मणेरी, आयाजभाई मणेरी यांच्यासह शिवप्रेमी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.