नंदेश्वर येथे चेतना पतसंस्थेतर्फे विद्यार्थ्यांना किटचे वाटप

मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील श्री बाळकृष्ण विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची नुकतीच जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली होती. यामध्ये निवड झालेल्या एकूण ४५ विद्यार्थ्यांना चेतना महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था व चेतना परिवार यांच्या वतीने किटचे वाटप चेतनाचे मार्गदर्शक सुधीर गरंडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना करण्यात आले.
यावेळी चेतनाचे व्हा चेअरमन दत्ता बंडगर,सचिव अण्णा बंडगर,संचालक नवनाथ मेटकरी,प्राचार्य विठ्ठल एकमली यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.