शिवछत्रपती अश्वारूढ शिवशिल्पाचे प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचेकडून स्वागत

सांगोला (प्रतिनिधी) प्रजाहितदक्ष, अष्टवधानजागृत, श्रीमंत योगी, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवशिल्पाचे सांगोला शहरामध्ये उत्साहात, जल्लोषात आगमन झाले. सांगोला शहरातील भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा स्वागत सोहळा मिरवणुकीमध्ये सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला, अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी सांगोला विद्यामंदिर येथील चौकात शिवरायांच्या चरणी पुष्पहार अर्पण करून स्वागत केले.
यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अमोल गायकवाड व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी चौकात अनेक वर्षापासून अश्वारूढ शिवशिल्प व्हावे अशी मागणी होती ती पूर्ण झाली असून शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी पूर्णाकृती अश्वारूढ शिवशिल्पाच्या लोकार्पण सोहळ्याच्या
निमित्ताने सकाळी अकरा वाजता शहरातील श्री.अंबिका मंदिर येथून ढोल, लेझीम, टाळ पथक तसेच उंट घोडे, मावळे यांचा समावेश असणारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी सजीव व शिवकालीन देखावे सादर करण्यात आले होते.या अनोख्या मिरवणुकीने अनेकांना मंत्रमुग्ध केले.त्याचबरोबर शिवछत्रपतींचे शौर्य, कार्यकर्तृत्वाची जाणीवजागृती झाली.