मातोश्री’तून लोकांची दु:ख कळत नाही, हे ठाकरेंना उशिरा समजले; चंद्रकांत पाटील

मातोश्रीतून लोकांची दु:ख कळत नाही, त्यासाठी लोकांमध्ये जावे लागते हे ठाकरेंना उशिरा समजले म्हणून ते आता जनतेमध्ये जात आहे, असा टोला भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी ठाकरेंना लगावला आहे. तर 2024 पर्यंत राष्ट्रवादी एकत्र राहिल का असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.आदित्य ठाकरेंनी दौरा केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो, मात्र गेली अडीच वर्षे आदित्य ठाकरेंनी ही भूमिका घेतली असती तर बरे वाटले असते असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावे असे विधान रोहित पवार यांनी केले होते. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मात्र 2024 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस मविआमध्ये असणार का? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकत्रित राहतील का असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित करत राष्ट्रवादीच्या फुटीच्या चर्चांना अजून पाठबळ दिले आहे. मुख्यमंत्री होण्याचा विचार करण्यापेक्षा एकत्र राहण्यासाठी मेहनत घ्यावी असे ही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. विरोधकांनी विचारांची लढाई लढायला हवी, अशी वयक्तिक टीका करू नये यामुळे जनता त्रासते असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.