भगवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील “गौरी गणपती सजावट स्पर्धेचा” बक्षीस वितरण संपन्न

सजावट स्पर्धेत ७ पैठणी ,१५ कुकर ,२० टिफीन व २५ हॉट पॉट च्या बक्षिसांचा मिळाला मान

सांगोला / प्रतिनिधी :: कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या “भगवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेला” सांगोला शहर आणि तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ शनिवार दी.२८ सप्टेंबर रोजी “हर्षदा लॉनस् येथे पार पडला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष मा. जि. प. अध्यक्षा सौ जयमालाताई गायकवाड, सौ शिलाकाकी झपके,सौ.मधुमती साळुंखे ,सौ. रूपमती साळुंखे,सौ.जयश्री भाकरे,सौ.राजलक्ष्मी पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.यावेळी माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील संयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 

 

महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मागील वर्षा पासून कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने “भगवतभक्त शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या स्मरणार्थ घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा ” आयोजित केल्या जातात.चालू वर्षी या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला असून यामध्ये सांगोला शहर व तालुक्यातून शेकडो महिलांना गौरी गणपतीच्या निमित्ताने बेटी बचाव ,बेटी पाढाव,पर्यावरण संवर्धन झाडे लावा झाडे जगवा, स्वच्छ भारत सुंदर भारत यासह अनेक सामाजिक थीम घेवून सहभाग नोंदविला होता.यासाठी विजेत्यांना पैठणी, कुकर, मिक्सर, हॉट-पॉट, पितळी भांडे व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. तर स्पर्धेत सहभाग नोडविलेल्या सर्व महिलांना पितळी भांडे देवून सन्मानित करण्यात आले.

यावेळी सुवर्णाताई इंगोले, सौ शीलाकाकी झपके सौ पांढरे यांनी अप्रतिम अशा पार पडलेल्या स्पर्धा,त्यातील सहभाग यामुळे महिलांच्या कलागुणांना वाव मिळाला असून साळुंखे पाटील कुटुंबाकडून अशाच प्रकारच्या महिलांसाठी स्पर्धा पार पाडाव्यात अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून जयमालाताई गायकवाड बोलताना म्हणाल्या भगवत भक्त काकींनी घालून दिलेल्या संस्काराचा वसा आणि वारसा जतन करत असताना महिलांच्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा साळुंखे पाटील कुटुंबीयांचा मानस होता. त्यानिमित्तमागील वर्षापासून सुरू केलेल्या “भागवत भक्त शारदादेवी साळुंखे पाटील” यांच्या स्मृतिपित्यर्थ मागील वर्षापासून सुरू केलेल्या या स्पर्धांना उदंड प्रतिसाद मिळत असून यंदा सुमारे ५१५ स्पर्धकांनी या “घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेत सहभाग नोदविला.पुढील वर्षी आणखी मोठ्या प्रमाणात या स्पर्धा साजऱ्या करण्यासाठी आज या ठिकाणी ऊर्जा मिळाल्याचे सांगत सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले.यावेळी सुवर्णाताई इंगोले, सौ शीलाकाकी झपके सौ पांढरे यांनी अप्रतिम अशा पार पडलेल्या स्पर्धा,त्यातील सहभाग यामुळे महिलांच्या कलागुणांना वाव मिळाला असून साळुंखे पाटील कुटुंबाकडून अशाच प्रकारच्या महिलांसाठी स्पर्धा पार पाडाव्यात अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली.

दरम्यान स्पर्धा पार पडताना नोंदणी, सजावटीचे व्हिडिओ एकत्रीकरण त्याचे निरीक्षण, परीक्षण व बक्षीस वितरण व्यवस्था याचे साजोजन करणाऱ्या डॉ स्नेहा साळुंखे पाटील सौ सुचिता मस्के, स्वाती मस्के,शुभांगीताई पाटील, पूजा पाटील, रंजना बनसोडे, सखुताई वाघमारे सुनीता खडतरे,उर्मिला राऊत, वैशाली सावंत, सुवीता बनकर,चैत्रजा बनकर, अनिता कांबळे यांच्या नेटक्या नियोजनाचे उपस्थित महिलांनी कौतुक केले.बक्षीस वितरण सोहळ्यास रत्नप्रभा माळी, सुजाता केदार, मैनाताई बनसोडे, साधवी लोखंडे, शोभाताई खटकाळे, सरस्वती रणदिवे, तबसूम मुजावर, सुवर्णाताई इंगोले, विद्या देशपांडे, शुभांगी पाटील, शांताबाई चोथे, सरिता साळुंखे, राणी दिघे, छाया पाटील, स्वाती कांबळे, सुवर्णा खंडागळे, यांच्यासह नगरसेविका भामाबाई जाधव, पूजा पाटील, सुनिता खडतरे, रंजना बनसोडे, स्वाती मस्के, सविता बनकर, उर्मिला राऊत, वैशाली सावंत, अनिता कांबळे, सिमिंतीनी स्वामी, अझमुनीसा मुल्ला, चैत्रजा बनकर, शशिकला खाडे,वनिता माने, मंगलताई खाडे,सुजाता कांबळे , शकुंतला खडतरे, अनुराधा पाटील आदी मान्यवर महिला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button