देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांचे योगदान अविस्मरणीय ; दिपकआबा साळुंखे पाटील

परकीय आक्रमणाखाली पिचलेल्या देशातील तमाम नागरिकांच्या आयुष्यात स्वातंत्र्याची सोनेरी पहाट उगवावी म्हणून सर्वात प्रथम ब्रिटिशांच्या विरोधात हत्यार उपसानारे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचे देशाच्या स्वातंत्र्यासाठी असलेले योगदान कधीच विसरता येणार नाही. राजे उमाजी नाईक यांचे स्वातंत्र्याच्या लढ्यात असलेले योगदान अविस्मरणीय होते त्यांच्या कार्यापासून आजच्या तरुणांनी प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले.
जवळा ता सांगोला येथे शिवनेत्र बहिर्जी नाईक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या उमाजी नाईक जयंती कार्यक्रमातून ते बोलत होते. यावेळी युवा नेते डॉ. पियुषदादा साळुंखे पाटील, यशराजे साळुंखे पाटील, राजाभाऊ गुजले यांच्यासह जवळा परिसरातील नागरिक आणि रामोशी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना दीपकआबा म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात देश वासियांच्या रक्षणासाठी उमाजी नाईक यांनी ज्या पद्धतीने हत्यार उपसले त्याच पद्धतीने आज समाज व्यवस्थेतील सर्व समाजाचे रक्षणासाठी रामोशी समाज बांधव तत्पर आहे. इमानदारी आणि विश्वास हे दोन गुण रामोशी समाज बांधवांच्या रक्तातच आहेत त्यामुळे या समाजाचे योगदान नेहमीच व्यवस्थित महत्त्वाचे राहिले आहे. देशाच्या स्वतंत्र लढ्यातील आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या कार्यापासून आजच्या तरुणांनी प्रेरणा घ्यावी. उमाजी नाईक यांच्या विचारातून निर्माण झालेल्या तरुणाईमुळेच खऱ्या अर्थाने आपला देश सशक्त आणि समृद्ध होण्यास मदत होईल असा विश्वासही शेवटी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला.
———————————————————————-
जवळ्यातून शिवनेत्र बहिर्जी नाईक प्रतिष्ठानची स्थापना..!
हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी छत्रपती शिवरायांचे कान नाक आणि डोळे म्हणून बहिर्जी नाईक यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यांच्या कार्यापासून येणाऱ्या तरुणांनी प्रेरणा घ्यावी म्हणून माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या पुढाकारातून जवळा ता. सांगोला येथे शिवनेत्र बहिर्जी नाईक प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक आणि शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या कार्याचा दैदिपमान वारसा आणि दोन्ही महापुरुषांचे कार्य समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला जाईल.
राजाभाऊ गुजले,
शिवनेत्र बहिर्जी नाईक प्रतिष्ठान जवळा
———————————————————————-
तालुक्यातील रामोशी समाज दिपकआबांच्या पाठीशी..!
रामोशी समाजाचे आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक आणि शिवनेत्र बहिर्जी नाईक या दोन महापुरुषांची तालुक्यातील कोणत्याही नेत्याला कधीच आठवण झाली नाही. माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन शिवनेत्र बहिर्जी नाईक प्रतिष्ठानची स्थापना केली तसेच रामोशी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची भूमिका घेतली. तसेच वारंवार आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक आणि शिवनेत्र बहिर्जी नाईक या दोन्ही महापुरुषांच्या त्याचे स्मरण केले त्यामुळे सांगोला तालुक्यातील संपूर्ण रामोशी समाज माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील ;
अंगद जाधव,युवा नेते, महुद
———————————————————————-