स्मरणशक्ती वाढविण्यासाठी राजयोगाची आवश्यकता : ब्रह्माकुमारी सुप्रिया बेहन

सांगोला महाविद्यालय येथे “निसर्ग पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयातील पर्यावरण विभागाने याचे आयोजन केले होते.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय सामाजिक अध्यात्मिक संस्था शाखा सांगोला यांच्या सहकार्याने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम महेश भाई (इंदोर) यांनी संस्थेच्या इतिहासाबद्दल व कार्याबद्दल माहिती देताना सांगितले की, निसर्गात आपण जगत असताना त्याचा समतोल आपण जपला पाहिजे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ही संस्था मनाचा स्वास्थाबरोबरच निसर्गाचे ही स्वास्थ् निरोगी ठेवले पाहिजे असे मत व्यक्त केले. माउंटआबू येथून आलेल्या ब्रह्माकुमारी सुप्रियाबहन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, विश्वकल्याण व विश्वशांती साठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली आहे. ती सुंदर आहे पवित्र आहे. तिचे संवर्धन आपण केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी अभ्यास प्रगती करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात राजयोग साधना करावी. त्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढेल व तुम्ही उच्च लक्ष प्राप्ती करू शकता. एकाग्रतेसाठी स्मरणशक्ती वाढविण्यासाठी आपल्यातील वाईट संस्कार काढून टाकण्यासाठी राजयोगाचा उपयोग अत्यंत लाभदायक आहेत असे मत व्यक्त केले.
ब्रह्माकुमारी मीरा बहन यांनी पर्यावरण संरक्षणाचा ती सामुदायिक प्रतिज्ञा वाचन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी सर्वांचे स्वागत केले व मन व शरीर स्वास्थासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.कु. तेजश्री मिसाळ यांनी केले तर आभार प्रा.सोनल भुंजे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. संतोष कांबळे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते