सांगोला:- येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी, सांगोला येथे दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी राज्यस्तरीय तांत्रिक भित्तिपत्रिका सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.त्या मध्ये विविध औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातून जवळपास ८५ विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला सदर कार्यक्रम सांगोला केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशन, सांगोला यांचे सहकार्याने घेतला होता. सदर कार्यक्रमात श्री. सुनील कोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्यामध्ये त्यांनी भविष्यातील औषध निर्माण शास्त्र क्षेत्रातील सुवर्णसंधी बाबत माहिती दिली. फार्माकोविजिलन्स व इतर नवीन क्षेत्राबाबत तसेच जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा करण्याबाबत चे महत्व सांगितले. प्रा. अश्विनी झाडे यांना कॉलेज च्या प्रगतीचा आढावा दिला.
प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी प्रस्तावित केले त्यामध्ये पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा आयोजित करण्याबाबत चे महत्त्व सांगितले. तसेच भारतात फार्मासीस्ट यांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असल्याबाबत आणि या क्षेत्रातील भविष्यात येणार्या संधीबाबत मार्गदर्शन केले.
सदर स्पर्धेत प्रथम पारितोषिक रु. ५०००/- व सन्मान चिन्ह स्वेरी पॉलिटेक्ंनिक (फार्मसी) , पंढरपूर,द्वितीय पारितोषिक रु. ३०००/- व सन्मान चिन्ह , तृतीय पारितोषिक रु. २०००/- व सन्मान चिन्ह गणपती इंस्टीट्यूट ऑफ फार्मासुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, टेंभुर्णी यांना तसेच कन्सोलेशन पुरस्कार १. कॉलेज ऑफ फार्मसी , पाणीव, २. नूतन कॉलेज ऑफ फार्मसी, कवटेमहांकाळ व फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी, सांगोला यांना देण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. कु. अश्विनी भिंगे तसेच आभार प्रदर्शन प्रा. कु. वैष्णवी कदम यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन मा. श्री. भाऊसाहेब रूपनर , व्यवस्थापन संचालक मा. डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक मा. श्री. दिनेश रूपनर आणि परिसर संचालक मा. डॉ. संजय आदाटे. इत्यादी मान्यवर उपस्थित होते.