सांगोला तालुका

सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला दहावी बॅच सन 2003 च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

 

 

 

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला दहावी बॅच सन 2003 च्या विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा गुरुवार दिनांक 27 ऑक्टोबर 2022 रोजी विद्यामंदिर प्रशालेच्या प्रणांगणात अत्यंत खेळीमेळीच्या व उत्साही वातावरणात पार पडला.

सदर कार्यक्रमाला दहावी बॅच सन 2000 चे 75 विद्यार्थी उपस्थितीत होते व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य श्री भीमाशंकर पैलवान सर यांनी भूषविले तसेच दहावीला शिकवणारे सर्व शिक्षक व मॅडम हे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीशैल्य घोंगडे यांच्या हस्ते करण्यात आले. या बॅचचे विद्यार्थी प्रा.गणेश पैलवान यांनी सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक व स्वागत केलेव उपस्थित शिक्षकांचे सत्कार विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले.

या बॅचमधील विविध क्षेत्रात कार्यरता सर्व विद्यार्थ्यांनी आपला स्वयं परिचय उपस्थित त्यांना करून दिला व या बॅचच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत ही व्यक्त केले. कार्यक्रमाला उपस्थित असणारे श्री. सलगर सर, श्री. कसबे सर सौ.महिमकर मॅडम, सौ. कुलकर्णी मॅडम, श्री.सय्यद सर , श्री. नाकील सर यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना उज्वल आयुष्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच प्राचार्य भीमाशंकर पैलवान सर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केली.

सूत्रसंचालन प्रा.प्रसाद खडतरे सर यांनी केले तर नीलकंठ शिंदे सर यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री.मुकुंद हजारे, प्रा.गणेश पैलवान, श्री. श्रीशैल्य घोंगडे, प्रा.प्रसाद खडतरे, डॉ. शैलेश डोंबे, डॉ. असलम सय्यद, श्री.उदय घोंगडे, श्री.इकबाल शेख सर, आशिष पाटणे , विशाल नलवडे, आनंद दौंडे, नीलकंठ शिंदे, रामचंद्र डिगोळे, सुहास देशमुख, श्रीकांत कांबळे, विजय सांगळे, विजय सांगळे, महेश कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, इंजी प्रतीक शेंडे, प्रा. तन्मय ठोंबरे, नवनाथ कुरुलकर, नितीन सुरवसे, सौ.रेशमा यादव, सौ. श्रुती हत्ती, सौ.प्रियांका सावंत, सौ.पाटणे, सौ.वाघमारे, रविशंकर बिराजदार, इंजि. अविनाश जाधव, डॉ. संदेश ताटे, लक्ष्मण टिंगरे, नागेश अवधूतराव, इंजि. सुजित बाबर, बाळासाहेब चोरमुले, विशाल सरवदे, संदीप खटपे, गणेश भद्रशेट्टी, मयूर ढोले, सचिन ढेरे, प्रदीप स्वामी, हर्षद पाटील, संतोष सुरवसे, सचिन शिंदे, प्रशांत पगारे, दत्तात्रय गडदे, अण्णा गडदे, आसिफ मुजावर, दत्तात्रय पवार, सम्राट गुंजकर, हर्षद तांबोळी, मनोहर इंगोले, स्वप्निल गडहिरे, फैयाज बागवान यांनी विशेष परिश्रम घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!